युवा शक्तीला सेवा संस्कार देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करते - राहुल मोरे

युवा शक्तीला सेवा संस्कार देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करते - राहुल मोरे
बीड/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन घडत असताना त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव,सामाजिक बांधिलकी, सेवाभाव निर्माण करण्याची कार्य राष्ट्रीय सेवा योजना करत असते, 'माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी' हे लक्षात घेऊन या मधील विद्यार्थी सेवेची मूल्य आणि समाजभान लक्षात ठेवून समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात असे मत राहुल मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना निमित्त केले आहे.
आपल्या भविष्याच्या जडणघडणीत उज्वल भविष्य गाठत असतानाच आपण हि समाजाचे देणे लागतो, याची जाणीव या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. व तो त्या संस्कारातून आपले भविष्य घडत असतो, म्हणून प्रत्येकाने आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन राष्ट्रप्रेम,एकात्मता,समभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी, जोपासावी. आपल्या विचारांनी युवा ऊर्जा स्त्रोतांचा सुयोग्य उपयोग करत समाज घडविण्याचे कार्य नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे हे राष्ट्रीय सेवा योजना करत असते, आपल्या सह भविष्यातील पिढ्यासाठीचेही संरक्षण हे युवक करत आहेत.
समाज परिवर्तनाचे कार्य या राष्ट्रीय सेवा योजनेमुळे होत असून यामधून सेवाभाव,विज्ञान, राष्ट्रभक्ती, प्रामाणिकता, उदारता ,विश्वास, खेळाडू वृत्ती ,आशावाद, निसर्गप्रेम यांच्यासह इतरही व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, राष्ट्रीय सेवा योजना विविध उपक्रमाद्वारे, सामाजिक शिबिराद्वारे आपले सामाजिक कार्य करत असते, म्हणून प्रत्येक युवकांनी आपल्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत आपल्या कौशल्याच्या जोरावर आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.








