मुस्लिम संघर्ष समितीने धारूर शहरातील कोविड योध्याना केले सन्मानित

Dharur

मुस्लिम संघर्ष समितीने धारूर शहरातील कोविड योध्याना केले सन्मानित

किल्ले धारूर/इरफान शेख

 धारूर येथे आज गालिब शाह बहुउद्देशीय सेवा भावी संस्था मुस्लिम संघर्ष समिती महाराष्ट्र यांनी कोविड १९ आपत्ती मध्ये धारूर तालुक्यात देशहितासाठी समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोविड योध्या हा पुरस्कार देवून सन्मानित केले कोरोना  सारख्या महा भयंकर महामारितही पत्रकार डॉकटर, पोलीस प्रशासन यांच्या खांद्याला खांदा देवून कार्य करत आहेत त्या बद्दल  नाथा ढगे, रवी गायसमुद्रे, सतीश पोतदार, अतीक मोमीन, शेख इरफान यांचा सन्मान करण्यात आला
 मुस्लिम संघर्ष समितीचे इंजि. सादेक इनामदार,ऍड सय्यद साजेद,सय्यद रज़्ज़ाक,शेक अकरम भाऊ,शेख शादाब,इमरान कादरी,सोहैल जरगर यांच्या हस्ते  करण्यात आले.

Sharing

Visitor Counter