जिल्हयातील प्राचार्यांची कार्यशाळा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०

जिल्हयातील प्राचार्यांची कार्यशाळा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०
बीड/वार्ताहर
दि.२८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० प्रभावीपणे अंमलबजावनी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने चारही जिल्हयात प्राचार्य, समन्वयकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या संदर्भात गेल्या आठवडयात बैठक होऊन मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी प्राचार्यांशी संवाद साधला. या अंतर्गत दुस-या टप्प्यात विद्यापीठाशी संलग्नित चारही जिल्हयात प्राचार्यं व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख आयक्युएसी व संगणक क्षेत्राचे अभ्यासक प्राध्यापक प्रत्येक महाविद्यालयातून दोन जण कार्यशाळेत येणार आहेत. के एस के महाविद्यालयात येत्या शुक्रवारी दि.३० बीड जिल्हयातील कार्यशाळा होईल. तर उस्मानाबाद जिल्हयाची कार्यशाळा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सकाळी १० ते ६ यावेळेत होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.चेतना सोनकांबळे, प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हयातील सर्व प्राचार्य व प्रत्येक महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव आय.आर.मंझा यांनी केले आहे. दरम्यान, औरंगाबाद व जालना जिल्हयातील प्राचार्य / समन्वयकांची कार्यशाळा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे.








