संजीवनी इंग्लिश स्कुल ने ग्रामीण भागातल्या महिलांसाठी जातेगाव रास दांडीया महोत्सव केला साजरा 

Beed

संजीवनी इंग्लिश स्कुल ने ग्रामीण भागातल्या महिलांसाठी जातेगाव रास दांडीया महोत्सव केला साजरा 

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील संजीवनी इंग्लिश स्कूलच्या वतीने ग्रामीण भागातील मुली व महिलांना दांडीया खेळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून संजीवनी इंग्लिश स्कुल जातेगाव च्या सचीव डाॕ. अर्चना चव्हाण मॕडम यांनी दि. 4/10/2022 रोजी फक्त मुलींसाठी व महिलांसाठी रास दांडीया आयोजित करुन व्यासपीठ निर्माण करून दिले त्याबद्दल संजीवनी इंग्लिश स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे

ग्रामीण भागातील मुली व महिलामध्ये विविध गुण असतात फक्त त्यांना संधी मिळण्याची आवश्यकता असते ,जातेगाव परिसरातील मुली व महिला यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला व उत्कृष्ट दांडीया खेळून आंनद व्यक्त केला , संस्थेच्या वतीने प्रथम बक्षीस म्हणून पैठणी साडी, दुसरे बक्षीस चांदीचा करंड , तृतीय बक्षीस डिनर सेट आणि इतर बक्षिसे व मेडल ,प्रमाणपत्र यांचे मान्यवारांचे हस्ते वाटप करण्यात आले. शेवटी सर्व सहभागी मुली व महिलांनी बेधडकपणे सैराट ,झिंगाट व गरबा या गाण्यावर अप्रतिम असे सामूहिक डान्स केले, जातेगाव येथे पहिल्यांदाच रास दांडिया कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वत्र संजीवनी इंग्लिश स्कूलचे कौतुक अभिनंदन होत आहे

Sharing

Visitor Counter