कमी पट संख्येच्या शाळा बंदीविरोधात वंसतरावजी नाईक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासबोर निदर्शने

कमी पट संख्येच्या शाळा बंदीविरोधात वंसतरावजी नाईक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासबोर निदर्शने
शाळा बंद झाल्यास दुर्गम घटकातील पोर पुन्हा अंधकाराच्या गर्तेत ढकलले जाणार -जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण
बीड/वार्ताहर
कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद झाल्यास गोरगरीब, शोषित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची परवड होईल, शाळा बंद न करण्यासाठी वंसतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्यातीने शासन प्रशासनाच्या या निणर्याविरूद्ध आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आले.
शाळा बंद केल्यास दुर्गम भागाील मुलामुलींच्या शिक्षणाची आबाळ झाल्याशिवाय राहणार नाही. वित्तीय भाराच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे धोरण चुकीचे आहे.’ जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदेसाहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा’, शिंदेसाहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका’, मराठी शाळा वाचल्याच पाहिजेत’, शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती’ आदी घोषणा होत्या. शिक्षणावर खूप खर्च होत असल्याने सरकारला शाळा चालविणे परवडत नाही, असे म्हणून किंवा आडवळणाने कोणतेही कारण सांगत शाळा बंद करणे वा सरकारी शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे सरकारने मूलभूत अधिकाराचे हनन करणे आहे. शाळा बंद झाल्यास शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे आलेले घटक पुन्हा अंधकाराच्या गर्तेत ढकलले जातील. अशा विपरीत परिस्थितीत शिक्षण म्हणून राज्यातील कोणतीही शाळा बंद होऊ नये, यासाठी वैयक्तिक पातळीवर कर्तव्य म्हणून प्रामाणिक प्रयत्न करण्याची आज गरज आहे. राज्यातील कोणतीही शाळा बंद करू नये यासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव होण्यासाठी लोकप्रतिनिधी, समाजातील जबाबदार व संवेदनशील घटक म्हणून पुढाकार घ्यावा, गावात शाळेचे महत्त्व समजावून सांगावे, ग्रामपंचायतीत ठराव घेऊन ठरावाची प्रत प्रशासनिक यंत्रणेकडे पाठविण्याचे आवाहन वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेकडून केले आहे. यावेळी वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, जिल्हा सचिव प्रो.डॉ.आबासाहेब राठोड, ज्येष्ठ मार्गदर्श बाबासाहेब चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य राजेशकुमार राठोड, जिल्हा उपाध्यक्ष शिवलाल राठोड, जिल्हा कार्यध्यक्ष कॅ.प्रा.डॉ. जगन्नाथ चव्हाण, आदर्श शिक्षक प्रकाश राठोड, प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल पवार, संजय चव्हाण यांच्यासह बहुसंख्येने वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.








