शहरातील अंजुमन इशात ए तालीमच्या माध्यमातून मिलीया मुलांची व मुलींची शाळा भाग करून अवैधरित्या सुरू!

शहरातील अंजुमन इशात ए तालीमच्या माध्यमातून मिलीया मुलांची व मुलींची शाळा भाग करून अवैधरित्या सुरू!
बीड/वार्ताहर
शहरातील उर्दू माध्यमाची संस्था म्हणजे मिलिया चा नाव डोळ्यापुढे येतो परंतु शिक्षणाधिकारी यांनी अवैधरीत्या चालू असलेल्या भाग करून शाळा बंद करण्याचा आदेश देऊन ही ते बंद न करता सुरू असल्याचा आरोप शेख वसीम यांनी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की सदरील संस्था संचालित शाळांच्या भागशाळा बाबत अनेकदा तोंडी व लेखी कळवून देखील संस्थेवर कारवाई न झाल्यामुळे आपणास सदरील पत्र याद्वारे मी खालील प्रमाणे विनंती करीत आहे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी दिलेल्या पत्र दिनांक07 /08 / 1974 व दिनांक 4/8/1977 नुसार संबंधित संस्थेस त्यावेळेच्या बीड शहरांमध्ये उर्दू माध्यमाच्या स्वतंत्र शाळा नसल्यामुळे व सदरच्या संस्थेची ही एकच उर्दू माध्यमाची शाळा सुरू करण्यात आल्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून पालकांनी त्यांच्या मुलांना सदरील शाळेत प्रवेशित केल्यामुळे मुलांची संख्या वाढवून संस्थेकडे सदरील वाढलेल्या विद्यार्थी संख्येसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी त्यावेळीच्या पहिले ते चौथीच्या तुकड्या उघडण्याची परवानगी दिली होती.
तसेच सध्या परिस्थितीमध्ये संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारणा होऊन संस्थेने सदर उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी सर्व सुविधांनीयुक्त अशा खोल्यांची इमारत विनापरवानगी बांधलेली आहे तसेच आता शहरांमध्ये इतर उर्दू माध्यमाच्या संस्थेची उर्दू माध्यमाच्या शाळा उघडल्या असून जिल्हा परिषदेमार्फत उर्दू माध्यमाचे वर्ग चालविण्यात येत आहेत त्यामुळे शिक्षण विभागाने सदर संस्थेस अतिरिक्त वर्ग चालविण्याची दिलेली परवानगी रद्द होणे आवश्यक होते परंतु शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांचे पत्र दिनांक 21/ 4/2011 व शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांचे पत्र दिनांक 24/12/2010 आणि अनाधिकृत रीत्या चालू असलेले भाग शाळेचे वर्ग बंद करण्यात यावे असे कळूनही संस्थेने आजपर्यंत वर्ग चालूच ठेवले आहेत जे की बंद करणे आवश्यक होते.
सन 1974 पासून सदरील चालू असलेले भाग शाळेचे वर्ग अनाधिकृत विद्यार्थी संख्या दर्शवून संस्थेने अनेक शिक्षकांच्या नेमणुका केलेले आहेत व त्यामुळे शाळेतील शालेय पोषण आहार व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके या शासनाच्या योजनेमध्ये अफरातफर होत आहे असे शेख वसीम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.








