कपिलधार वाडीत तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह

Beed

कपिलधार वाडीत तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह

भाविकांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

बीड/प्रतिनिधी

ह.भ.प.बंकट स्वामी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने परमपूज्य सुदामदेव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री.ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली आजपासून तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन कपिलधार वाडी येथे करण्यात आले आहे. सदरील आयोजन वाघेश्वरी तरुण मित्र मंडळ व कपिलधारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

आज रविवार ( दि.16 ) तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ होत असून सांगता मंगळवारी ( दि. 18 ) रोजी होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काकड भजन, हरी किर्तन, हरी जागर होईल. यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून ह.भ.प भारत महाराज जोगी, ह.भ.प तुकाराम महाराज आंधळे यांचे कीर्तन होणार आहे.तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये ह.भ.प हरिहरनंद भारती महाराज विश्वनाथ आप्पा सलगर या अखंड हरिनाम सप्ताहाची काकडा नेतृत्व ह.भ.प हरिदास खुळे महाराज,बाप्पा महाराज शिंदे, मृदंगाचार्य म्हणून ह. भ.प.योगेश महाराज जोगदंड यासह गायनाचार्य व हरिपाठ तसेच गाथा भजन होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे लाभ घेण्याचे आवाहन समस्त वाघेश्वरी तरुण मित्र मंडळ व कपिलधारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter