फुलचंद भाऊ कराड यांनी सुनावले अधिकार्यांना खडेबोल

फुलचंद भाऊ कराड यांनी सुनावले अधिकार्यांना खडेबोल
शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदतीची केली मागणी
परळी/प्रतिनिधी
परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले असुन शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावुन घेतला असुन जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून सरसगट पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे नेते फुलचंद भाऊ कराड यांनी आपल्या सहकार्यांसह उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली दरम्यान श्री.कराड यांनी इंदपवाडी शिवारातील शेताची पाहणी करून पाण्यात गेलेले सोयाबीन सोबत घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्या टेबलवर ठेवले. शेतकरी हा अशिक्षीत असल्यामुळे ऑनलाईनचा ससेमिरा न लावता पिक विमा कंपनी व महसुल विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्येक गावात जाऊन चावडीवर किंवा मंदीरावर बसुन ऑनलाईनची प्रक्रिया करून घ्यावी असेही खडेबोल श्री.कराड अधिकार्यांना सुनावले.
सध्या राज्यासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ माजविला असुन कापुस, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले असुन त्यांना तात्काळ आर्थिक दिलासा देण्याची गरज असुन त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी श्री कराड यांनी केली आहे. गेल्या अननेक वर्षापासुन शेतकरी राजा अनेक निसर्ग संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी सतत होणार्या पावसामुळे तोंडचा आलेला सोयाबीन, कापुस यासह विविध पिके पावसामुळे भिजून नासाडी झाली आहे. कोणतेही पिक शेतकर्यांच्या हाती आले नसुन सरकारने शेतकर्यांच्या सोयाबीन, कापुस यासह विविध पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी 50 हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी. अन्यथा येत्या आठ दिवसांत शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे व आर्थिक मदत न मिळाल्यास लोकशाही पध्दतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहिल याची गंभीर दखल घ्यावी असा इशारा फुलचंद कराड यांनी दिला आहे. या निवेदनावर रिपाईचे नेते भास्करनाना रोडे, देविदास कराड, श्रीरामअण्णा मुंडे, राजेश देशमुख, काशीनाथ राठोड, वैजनाथ राठोड, मंचक मुंडे, प्रकाश राठोड, अच्युत कराड, अंगद मुंडे, खुशाल कांबळे, एम.टी.मुंडे, महादेव कराड, हनुमंत फड, प्रशांत कराड, रवि कराड, सायस फड, मुरलीधर मुंडे, श्रीमंत कराड, अॅड.बालासाहेब कराड, भागवत नागरगोजे, मुक्ताराम कराड, बालासाहेब नागरगोजे, विजय कराड, नितीन बदने, गणेश कराड, रमेश आवचारे, वैद्यनाथ कराड, सहदेव कराड, शिवाजी फड, राजेश देशमुख यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्या आहेत.








