एआयएमआयएम पक्षाने निवडणूक पूर्व आढावा बैठकीतच मैदान मारले 

Beed

एआयएमआयएम पक्षाने निवडणूक पूर्व आढावा बैठकीतच मैदान मारले 

काय तो उत्साह, काय ती गर्दी, काय ते जनतेचं प्रेम !

अब अवाम और एआयएमआयएम दोनों को अच्छे दिन ज़रूर आयेंगे - अॅड. शेख शफीक भाऊ

बीड/प्रतिनिधी

नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एआयएमआयएम पक्षाने आपल्या पक्षाचा झंजावात सुरू केला आहे. या अनुषंगाने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ, हाजी इर्शाद, हाजी इसाक या तिन्ही पक्ष निरीक्षकांनी गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, परळी या चार तालुक्यात सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची आढावा बैठका दिनांक २० ऑक्टोबर २०२२ शुक्रवार रोजी घेतल्या. या चार तालुक्यातील आढावा बैठकीसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या प्रचंड मागणीमुळे पात्रुड या गावातही बैठक घ्यावी लागली. या पाचही ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांची अफाट उपस्थिती पाहता एआयएमआयएम पक्षाने निवडणूक पूर्व आढावा बैठकीतच मैदान मारल्याचे दिसून येत आहे. काय तो उत्साह, काय ती गर्दी, काय ते जनतेचं प्रेम सगळं कसं स्वप्नवत, हे दृश्य पाहून अॅड. शेख शफीक भाऊ म्हणाले,

अब अवाम और एआयएमआयएम दोनों को अच्छे दिन ज़रूर आयेंगे, इन्शाअल्लाह. यावर उपस्थितांनी बुलंद आवाजात आमीन म्हणत अल्लाह कडे दुवा केली.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद च्या निवडणुका जसजसे जवळ येत आहे तसतसे एआयएमआयएम मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील, राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाडा विभागाध्यक्ष फिरोज लाला, राज्य सरचिटणीस सय्यद मोईन यांचे मार्गदर्शन व निर्देशानुसार जिल्हा पातळीवर पक्षाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शेख शफीक भाऊ हे खंबीररित्या करीत आहे. भाऊंनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्यांची मोट बांधली. आज त्याचे पडसाद एआयएमआयएम पक्षाची सभा असो, आढावा बैठक असो की अजून कोणतेही कार्यक्रम असो प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित प्रचंड संख्येने तरुण पिढीचा उत्साह स्पष्ट दिसून येत आहे. अशाच प्रकारे गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई आणि परळी या तालुक्यांसह पात्रुड या गावात पक्षनिरीक्षक म्हणून शफिक भाऊ, हाजी इर्शाद, हाजी इसाक यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सुद्धा दिसून आला. एआयएमआयएम पक्षाचा वारू आता सुसाट निघाला आहे. यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरू लागली आहे.

यावेळी गेवराई मध्ये शेख युनूस तालुका प्रवक्ता, शेख फेरोज युवक शहराध्यक्ष, शेख शाकेर शहर सचिव, साहील शेख तालुका उपाध्यक्ष, लियाकत बेग तालुका सचिव, अमजद पठाण सोशल मीडिया तालुका अध्यक्ष. अंबाजोगाईत जिल्हा प्रवक्ता शेख रमीज, हिफाजत पठाण शहराध्यक्ष, शेख समीर तालुका युवक अध्यक्ष, सत्तार तांबोळी युवक शहराध्यक्ष, शेख फेरोज, आरेफ अहमद, शेख तय्यब, शेख फहीम, परवेझ खान, अशरफ बागवान, आरेफ काझी, सलीम परस वाले, इस्माईल गवली, शेख गणी बाजी, यास्मिन तांबोळी,

सायगाव शहराध्यक्ष रईस भाई. माजलगावात मतदार संघ प्रभारी सिद्दिक भैय्या, धारूर शहराध्यक्ष मोबीन सहाब, वडवणी शहराध्यक्ष शेख आमेर, तालुका अध्यक्ष शेख अकबर. माजलगाव - इद्रिस शेख तालूकाध्यक्ष, शेख रशिद शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच पात्रुड युसूफ शेख, गुड्डू खतिब शहर संघटक, नावेद सिद्दिकी युवा नेते, हाफेज फारुख तालुका प्रवक्ता, हाफेज फारुख, शमशेर पठाण युवक तालुकाध्यक्ष, अन्सर शेख उपतालुकाध्यक्ष, मजहर शेख व अन्य कार्यकर्ते.परळीत मा.ता.अध्यक्ष शेख शरीफ भाई, नगरसेवक ताज खान पठाण, युवानेते शेख मोहसिन, शेख मुस्तफा भाई, फेरोज खान उर्फ जनाब, शेख तोफीक भाई, समीर कुरेशी, शेख अनवर, शाहरूख खान, शेख मलीक, असलम खान, तोहीद शेख, शेख अकबर, कुरेशी अबुज़र, सुलेमान मनियार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते. बीड तालुकाध्यक्ष तथा बीड जिल्हा उपाध्यक्ष खन्ना भैय्या, जिल्हा सहसचिव अन्वर पाशा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

Sharing

Visitor Counter