शासनाचा शिधा मिळणार कधी??दिवाळी पुर्वी कि नंतर?? दिवाळीच्या पुर्वसंध्येला लाभार्थी वंचित?

Beed

शासनाचा शिधा मिळणार कधी??दिवाळी पुर्वी कि नंतर?? दिवाळीच्या पुर्वसंध्येला लाभार्थी वंचित?? अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांना तक्रार-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

बीड/वार्ताहर 

शासनाच्या वतीने शिधापत्रिका धारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतरिक्त एक किलो रवा,एक किलो साखर,एक किलो चणाडाळ व एक लिटर पाम तेल अशा ४ शिधा वस्तुंचे किट १०० रूपयात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय झाला. दुकानदारा मार्फत प्रत्येक लाभार्थ्याला हे संच दिवाळी पुर्वो मिळण्याचे अपेक्षित होते. परंतु अद्याप ग्रामिण भागातील लाभार्थ्याला लाभ मिळ्ला नाही.बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल एकुण ३ स्वस्त धान्य दुकानातील एकुण ६०० लाभार्थी या आनंदाचा शिधावाटपा पासुन दिवाळी एक दिवसावर आली तरी वंचित असून संबधित प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण,सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग विजय वाघमारे यांना जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत ईमेल द्वारे तक्रार केली आहे. 

 

 जिल्हापुरवठा आधिकारी यांची बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात म्हणे ५ लाख किट वाटले 

जिल्हा पुरवठा आधिकारी ओंकार देशमुख म्हणतात जिल्ह्य़ात ५ लाख कार्डधारकांना दिवाळी कीट वितरीत करण्यात आले असून रेशन दुकानदारांकडून वाटप सुरू आहे. तसेच जनतेने जागरूक राहून शिध्याचा लाभ घेऊन दिवाळी साजरी करावी मात्र दिवाळी ऊद्यावर ठेपली तरी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अजुन किट उपलब्ध झालेच नाही. एकंदरीतच जिल्हा पुरवठा आधिकारी ओंकार देशमुख यांचा बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

 

जिल्हाधिकारी योजनेचा शुभारंभ करून मोकळे आणि तहसिलदार सुचना देऊन मोकळे 

दि.१९ ऑक्टोबर रोजी बीड शहरातील १७ क्रमांकाच्या स्वस्त धान्य दुकानावर प्राथमिक स्वरूपात शिधावाटप करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आदित्य जीवने,जिल्हापुरवठा आधिकारी ओंकार देशमुख,तहसिलदार सुहास हजारे,नायब तहसीलदार महादेव चौरे उपस्थित होते यावेळी तहसिलदार हजारे यांनी बीड तालुक्यातील ३४० स्वस्त धान्य दुकानदारांना ३ दिवसात वाटप करण्याच्या सुचना दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती मात्र अजून ग्रामिण भागातील लाभार्थी वंचित आहेत. 

 

लिंबागणेश येथील तिनही स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा पोहचलाच नाही 

बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १ शिलावती भालचंद्र गिरे शिधापत्राका २७३ ,स्वस्त धान्य दुकान क्रमांक २ सखाराम वायभट शिधापत्रिका २२३ आणि स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३ औदुंबर नाईकवाडे शिधापत्रिका १२८ असे एकंदरीत ६२४ लाभार्थ्यांना शिधावाटप पुरवठा न झाल्यामुळे वितरीत केला नसल्याचे सांगितले,शिधापत्राकाधारक दुकानावर येऊन वारंवार विचारणा करतात मात्र अद्याप पुरवठा झालाच नसल्यामुळे आम्ही वितरीत कसे करणार अशी खंत व्यक्त केली. 

Sharing

Visitor Counter