अमरसिंह ढाका यांची महाराष्ट्र टपाल क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड 

Beed

अमरसिंह ढाका यांची महाराष्ट्र टपाल क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड 

बीड/प्रतिनिधी

दि.29 बीड शहराचे भूमिपुत्र तथा बीड पोस्टल विभागातील मुख्य डाग विभागात कार्यरत असलेले अमरसिंह ढाका यांची महाराष्ट्र पोस्टल क्रिकेट क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. लखनऊ येथे दिनांक 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या अखिल भारतीय टपाल क्रिकेट स्पर्धे साठी महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून बीड विभागाचे पोस्ट मास्तर अमरसिंग ढाका यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली. दिनांक 28 व 29 ऑक्टोबर रोजी सिंहगड कॉलेज क्रिकेट मैदान वडगाव बुद्रुक पुणे येथे महाराष्ट्र पोस्टल क्रिकेट संघाची निवड चाचणी घेण्यात आली यामध्ये महाराष्ट्रभरातून 118 खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी महाराष्ट्र संघात 15 खेळाडू निवडण्यात आले व बीडचे अष्टपैलू खेळाडू अमरसिंग ढाका यांची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली त्यांचे सर्वांनी कौतुक केले. बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र असल्यामुळे बीड शहरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे . निवड करण्यात आलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे अमरसिंग ढाका, (कर्णधार ) सागर पाटील, (उपकर्णधार) विशाल गोरे, (यष्टीरक्षक) कैवल्य सावंत, सनी मोरे, अनिमेस सिंग, कैलास राऊत, सतीश उबाळे, रवी पाल, कुलदीप पाटील, सुनील दिघे, तानाजी मुलगे, रुपेश मिस्त्री, लोकेश देसाई,आणिल शशांक खंडाळकर. आधीची निवड करण्यात आली आहे.

Sharing

Visitor Counter