खड्डे काय भरता रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरूवात करा-इम्रान जागीरदार

Beed

रस्त्याचे डेंटर झाले पण टेक्केवारीमुळे ते थांबले 

खड्डे काय भरता रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरूवात करा-इम्रान जागीरदार 

        बीड/वार्ताहर 

शहरात मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले या विषयी शिवसंग्रामनी तीव्र आंदोलन केले आमदार मेटे हयात असतांना त्यांनी शासनाला या रस्तेसाठी निधी देण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन शासनानी नवगण राजूरी ते मौज या रस्त्यासाठी व तसेच बायपास टू बायपास या 12 कि.मी. च्या रस्त्यासाठी निधी मंजूर केली आ.मेटे यांनी या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला यामुळेच या कामाला निधी मिळाली पण याचा श्रेय इतरांनीच घेण्याचा प्रयत्न केला अधिकार नसतांना ही स्वतः रस्त्यावर उतरून नारळ फोडून हे रस्ता आम्हीच मंजूर करून आणण्याचा दिखावा केला पण यामध्ये ही दांडी मारली बायपास टू बायपास या 12 कि.मी. चा काम पुर्ण ना करता राष्ट्रवादी भवन ते बार्शी नाकेच्या पुलपर्यंतचा रस्ता तसाच सोडून दिला आज या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले याचा श्रेय कोण घेणार काल पुन्हा हे श्रेय बहादुर खड्डे भरण्याचा फोटो सेशन करत आम्हीच हे रस्तेचे खड्डे भरत आहे हे दाखवत होते राजुरी ते मौज पर्यंतचे रस्त्याचे कामाचे निवेदा प्रसिध्द झाले ठाकेदाराला काम ही मिळाले फक्त टक्केवारी न मिळल्याने हे निवेदा रद्द करण्यात आले आता पुन्हा नवेने निवेदा मागविण्यात आले असून आता या रस्त्याचा काम सुरू करण्याऐवजी पुन्हा शिवाजी महाराज यांच्या पुतळा पासून ते स्वतःच्या बंगल्या पर्यंत पुन्हा खड्डे भरण्याच्या कामाला सुरू केली आता हे टक्केवारीचा काम बंद करा आणि रस्त्याचा कामाला सुरूवात करा अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते इम्रान जागीरदार यांनी प्रसिध्द दिलेल्या पत्रकात केली आहे.

Sharing

Visitor Counter