महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

Beed

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

बीड/वार्ताहर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा -२०२२ शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी बीड जिल्हाकेंद्रातील एकुण ८ उपकेंद्रामधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २ हजार ८०८ उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फौ.प्र.सं.१९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

आयोगाच्या सुचनेनुसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांचेकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहीत्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेचे आवश्यक साहीत्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत : चे आधारकार्ड , निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांचे परिक्षा उपकेंद्रावर सकाळी ८.३० वाजेपूर्वी उपस्थित राहणेबाबत सूचित करण्यात आले आहे. परिक्षा सुरु झाल्यानंतर परिक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

Sharing

Visitor Counter