तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन 10 किलोमीटर मध्ये तिसरा मोहिनी बर्डे

तिरुमला बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन 10 किलोमीटर मध्ये तिसरा मोहिनी बर्डे
बीड/प्रतिनिधी
बीड 6 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बीड जिल्ह्यामधील पहिल्या राज्यस्तरीय मॅरेथॉनचे आयोजन तिरूमला ऑइल बाय द कुटे ग्रुप व योगा प्रतिष्ठान बीड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातुन स्पर्धक आले होते. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी आपला सहभाग केला आहे. हि स्पर्धा 5 किलोमीटर,10 किलोमीटर व 21 किलोमीटर मध्ये ही स्पर्धा झाली, 10 किलोमीटर मॅरेथॉन मध्ये मोहिनी बर्डे हिचा तिसरा क्रमांक आला आहे,
बीड जिल्ह्यातील हि पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा असून बीडच्या पालवन ते तुपे वस्ती या रस्त्यावर हा रस्ता निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगरदऱ्यातून जात असल्यामुळे मोठया प्रमाणात हिल पाहायवयास व अनुभवायास स्पर्धकांना मिळाला आहे आहे. योगा ग्रुप बीड जिल्ह्याचे नाव कसे उंचावेल या साठी प्रयत्न करीत आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना उकृष्ट प्रकारचे टी-शर्ट, मेडल , आणि सर्वाना अल्पउपहार देण्यात येणार आहे. तसेच पहिला , दुसरा आणि तिसरा येणाऱ्या प्रत्येक गटातून रोख आकर्षक बक्षीस पण देण्यात आले आहे.








