ओंकार विद्यालयासह गावाचे व राज्याचे नाव उज्वल करेल-रामकृष्ण रंधवे बापु महाराज यांचे प्रतिपादन

ओंकार विद्यालयासह गावाचे व राज्याचे नाव उज्वल करेल-रामकृष्ण रंधवे बापु महाराज यांचे प्रतिपादन
लिंबागणेशचा भुमिपुत्र ओंकार पाटीलचा भालचंद्र विद्यालयात ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी/लिंबागणेश
ओंकार पाटील हा एक आदर्श विद्यार्थी असून माता पित्यांच्या संस्कारात घडलेला मुलगा आहे. तो जर्मनीला जात असुन आपल्या विद्यालयाचे, गावाचे आणि राज्याचे नाव निश्चीतच उज्वल करेल यात काही शंका नाही असे प्रतिपादन रामकृष्ण रंधवे बापू महाराज यांनी लिंबागणेश येथे केले.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील येथील ओंकार रमेश पाटील हा पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला नुकताच रवाना झाला आहे. जर्मनी येथील विद्यापीठातून रिनेव्हेबल एनर्जी या विषयावर तो पदव्युत्तर एम एस पूर्ण करणार आहे. तो जर्मनीला रवाना होण्यापूर्वी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने त्याच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामकृष्ण रंधवे बापू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजसाहेब देशमुख ,उपाध्यक्ष नवनाथ थोटे , काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे नवनाथ नवसे पाटील , ओंकारचे वडील रमेश पाटील , केजचे नगरसेवक पशुपती दांगट , सुजित देशपांडे डॉ. सुधाकर आंधळे, बाबाराजे देशमुख, शिक्षक नेते उत्तमराव पवार बबनराव सूर्यवंशी, बिबीशन रसाळ, सरपंच स्वप्निल गलधर , राहुल जाधव , गणपत तागड , मोहनराव कोठुळे , सोमा गायकवाड यांच्यासह प्राचार्य सावंत , सुपरवायझर हावळे ,माजी प्राचार्य दत्तात्रय मानकर , माजी प्राचार्य यु.एस. बांगर आदी उपस्थीत होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे यांनी केले.
आपल्या ज्ञानाचा देशासाठी करेल
जर्मनी येथे ओंकार पाटील जात आहे परंतु पुढील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या देशामध्ये भारतात येऊन आपल्या ज्ञानाचा आपल्या देशातील लोकांना फायदा होईल यासाठी निश्चीत प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे.
राजेसाहेब देशमुख ,जिल्हाध्यक्ष काँग्रेस, बीड
मी गावाला विसरणार नाही
मी गावाला देशाला विसरणार नाही ,विद्यार्थी मित्रांनी चांगला अभ्यास करून माझ्याप्रमाणेच परदेशी शिक्षण घेऊन आपल्या देशाची सेवा करावी. कोणतेही गोष्ट अशक्य नसते फक्त प्रेरणांची गरज असते. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत यासाठी आपल्या देशाला विजेची कधीही कमतरता पडणार नाही यासाठी मी प्रयत्न करेल असे ओंकार पाटील याने सत्कारास उत्तर देतांना सांगीतले.








