डॉ. अल्लामा इक्बाल जयंती निमित्ताने इस्लाम दर्शन केंद्रात जागतिक उर्दू दिवस साजरा

Beed

डॉ. अल्लामा इक्बाल जयंती निमित्ताने इस्लाम दर्शन केंद्रात जागतिक उर्दू दिवस साजरा

विविध क्षेत्रातील उर्दूशी संबंधित मान्यवरांचा सत्कार

बीड/प्रतिनिधी

दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी जगभरात जागतिक उर्दू दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने तंजीम तरक़्क़ी उर्दू व मौलाना आज़ाद विचार मंच बीड तर्फे जमाअ्त ए इस्लामी हिंद कार्यालयातील इस्लाम दर्शन केंद्रात विविध क्षेत्रात उर्दूशी संबंधित कार्य करत असलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

         स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या दैदिप्यमान लेखणीने "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ता हमारा" सारखी मधुर रचना दिलेले डॉ. अल्लामा इक्बाल यांच्या जयंती निमित्ताने दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी तंज़ीम तरक़्क़ी उर्दू व मौलाना आझाद विचार मंच बीड तर्फे शहरातील जमाअ्त ए इस्लामी हिंद कार्यालयातील इस्लाम दर्शन केंद्रात विविध क्षेत्रात उर्दूशी संबंधित असलेले शहरात फक्त उर्दू वृत्तपत्रांचे वितरण करणारे उबेद देशमुख, आपल्या अत्यंत आकर्षक व देखण्या कलाकारीने उर्दू आणि अरबी भाषेतील लिखाणामुळे फक्त बीड शहरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांनी नावलौकिक मिळविले असे व्यक्तिमत्व शाह आर्ट्स चे सय्यद शहेनशहा अहेमद, अल् हूदा शाळेतील उर्दू विषयाचे शिक्षक रहेबर सर आणि मुंबई येथील काज़ी शहेबाज़ या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, फुलहार, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके देऊन अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

या छोटेखानी कार्यक्रमाची प्रस्तावना काज़ी मुजिबूर्रहेमान सर यांनी केली. तर शहरातील सुप्रसिद्ध उर्दू शायर, कवी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद हसीन अख़्तर यांनी आपले विचार मांडताना म्हटले की, उर्दू भाषा ही जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये सर्वात गोड भाषा आहे. आपल्या सर्वांच्या हातून यापुढेही उर्दू साठी चांगल्यात चांगले कार्य घडत राहो अशा सदिच्छा व्यक्त करून या भाषेत आपण सर्वजण कार्य करीत असल्याने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअ्त ए इस्लामी हिंदचे बीड शहराध्यक्ष प्रा. सय्यद शफीक हाशमी सर होते तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद ज़करिया मदनी, उद्योजक अब्दुल हमीद देशमुख, शेख अब्दुल हमीद सर, शेख यासीन पाशा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter