आधारभूत खरेदी योजने मधील भरडधान्य नोंदणीची 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत

आधारभूत खरेदी योजने मधील भरडधान्य नोंदणीची 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत
बीड/वार्ताहर
जिल्ह्यात किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत हंगाम 2022-23 मधील भरडधान्य ज्वारी, बाजरी व मका नोंदणीची 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत अंतिम मुदत असून जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी करिता जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बीड यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने एकूण 18 खरेदी केंद्रांना मंजूरी दिलेली असल्याचे जिल्हा पणन अधिकारी, एस.बी. गोलेकर यांनी कळविले आहे
तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी नोंदणीसाठी आवश्यक असणारे कागदपत्र आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, ऑनलाइन पीक पेरा नोंद असलेला 7/12 उतारा व चालू असलेला मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह स्वत: नोंदणीसाठी खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या शेतमालाची नोंदणी करून लाभ घ्यावा.
मंजूर केंद्र पुढलप्रमाणे आहेत. बीड, चौसाळा, लोळदगाव, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, घाटनांदूर, बर्दापुर, केज, आष्टी, शिराळ, पाटोदा संघ, पाटोदा कुसळंब, महासांगवी, वडवणी, शिरूर, धारूर या ठिकाणी दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत नोंदणी सुरू राहील.
ज्वारी,बाजरी व मका या पिकाची आधारभुत किंमत ज्वारी संकरीत 2970/-रुपये, बाजरी 2370/- मका 1962/- रुपये याप्रमाणे








