भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले गदळे कुटुंबियांचे सांत्वन

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले गदळे कुटुंबियांचे सांत्वन
स्व.बाळूताई गदळे यांच्या आठवणींना दिला उजाळा
प्रतिनिधी/बीड
दि.10 : परळी येथील भाजप महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय बाळूताई शामराव गदळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे गुरुवारी (दि.10) त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
पंकजा मुंडे व डॉ.शालिनी कराड यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय बाळूताई गदळे यांच्या आजारपणात काही महिन्यांपूर्वीच पंकजांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. त्यांच्या निधनामुळे कराड व गदळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय बाळूताईंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमाकांत मुंडे, संतोष हंगे, डॉ.अशोक थोरात, विजयकांत मुंडे, युवा नेते विष्णू घुले, डॉ.वासुदेव नेहरकर, मुरलीधर ढाकणे, सुरेंद्र तपसे, रामकृष्ण घुले, शिवकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सखाहरी गदळे, डॉ. शालिनी कराड, डॉ. शशीकांत दहिफळकर, इंजि. शरद गदळे, युवा नेते राहुल गदळे, डॉ. अनिता दहिफळकर, प्राचार्या जया गदळे, सुनील घोळवे, धनराज लाटे यांच्यासह कराड आणि गदळे कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती.








