जिल्हा रुग्णालय बीड येथे सामाजिक संरक्षण शिबीर संपन्न

Beed

जिल्हा रुग्णालय बीड येथे सामाजिक संरक्षण शिबीर संपन्न

बीड/वार्ताहर 

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड, एआरटी सेंटर बीड व विहान संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही संसर्गीत लाभार्थ्यांसाठी सामाजिक संरक्षण शिबीर शासकिय नर्सींग हॉल जिल्हा रुग्णालय बीड येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.सुरेश साबळे यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विविध सामजिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 

उपस्थित एचआयव्ही संसर्गीत लाभार्थ्यांना सामाजिक संरक्षण शिबीर आयोजना मागचा उद्देश प्रास्ताविकामध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी स्पष्ट केला. या शिबीराच्या माध्यमातुन विविध सामाजिक योजनेबद्दल माहिती दिली जाणारअसुन गरजु रुग्णांचे सामाजिक योजनांचे फार्म भरुन घेण्यात येणार आहेत असे स्पष्ट केले व एकटे नाहीत तुम्ही साथ आहोत आम्ही ही भावना वृध्दींगत करणे हा या शिबीराचा महत्वाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन मंगेश जाधव यांनी महिला व बाल विकास विभागाच्या योजनेबद्दल माहिती दिली यामध्ये प्रामुख्याने बालसंगोपन योजने विषयी उपस्थित लाभार्थ्यंना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर एआरटी सेंटर बीड येथिल वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.एन.बी.पटेल यांनी संजय गांधी निराधार योजना तसेच एसटी बस पास योजना बद्दल माहिती दिली. तसेच एआरटी सेंटर मार्फत दिले जाणारे औषधोपचार रुग्णांनी सातत्यपुर्ण घ्यावेत असे आवाहन केले. आयसीटीसी समुपदेशक जनार्धन माचपल्ले यांनी रुग्णांना नियमित उपचाराबरोबर आहार, व्यायाम तसेच वेळेवर संधीसाधु आजारावर तपासणी व उपचार करण्याच्या सूचना केल्या.

 

      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाखा सुर्यवंशी एआरटी डाटा मॅनेजर बीड यांनी तर आभार प्रदर्शन फारोकी एफ.आर. डापकु एमआई यांनी केले.

 

या शिबीराच्या यशस्वीतेसाठी सुहास कुलकर्णी, डॉ.एन.बी.पटेल, डॉ.अरुण राऊत, फारोकी एफ.आर., नवनाथ चव्हाण, जनार्धेन माचपल्ले, विशाखा सुर्यवंशी, संतोष नाईकनवरे, संतोष डोलारे, रामेश्वर वाघमारे, विठ्ठल राठोड, स्मिती कुलकर्णी, शांता खांडेकर, योगेश राऊत, एआरटीसेंटर बीड येथिल सर्व कर्मचारी तसेच लिंकवर्कर, विहान व सखी केंद्र अशा संस्थांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Sharing

Visitor Counter