विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तर्फे इयत्ता 11 वी 12 वी बीड विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे , डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समाजिक समता सप्ताह” तसेच “राष्ट्रनेता सेवा पंधरवडा” निमित्त “जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम” राबविण्यात आली.
अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी 12 वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाया विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करिता समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि विद्यार्थी /पालक विहित कालमर्यादेत समितीकडे अर्ज सादर न केल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासुन वंचित रहावे लागते.चालूवर्षात “विशेष मोहिमेच्या” अनुषंगाने इयत्ता 11 वी 12 वी शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला नाही अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांनी केले आहे.








