जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन
माजलगांव/प्रतिनिधी
बीड जिला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुनांना वाव देवून त्यांच्यात एकमेकीविषयी बंधुभाव सांधिक भावना निर्माण होण्यासाठी बीड येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आदित्यजी जिवने साहेब (भा.प्र.से.) सहाय्यक जिल्हाधिकारी बीड यांचे हस्ते उद्घाटन झाले. या वेळी उपस्थीत मा. आसलकर मॅडम अध्यक्ष बालन्यायमंडळ बीड. मा. अशोक तांगडे अध्यक्ष बा.क.समिती बीड. मा. प्रज्ञा खोसरे सदस्या बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्द्घाटन समारंभ पार पडला. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे विनित मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. आर. आर. तडवी, व जि म. बा. कार्यालयातील कर्मचारी श्री. सय्यद साहेब, जाधव मंगेश साहेब (परिविक्षा अधिकारी) श्री. डोंगरदिवे एस.ए.(तालुका संरक्षण अधिकारी) श्री. गळगटे आर. एस. श्री. राउत एल. एस, श्री. कांबळे के.बी. श्री. उकरेपाटिल एस.डी. श्री. मस्के एस.ए. श्री गाडे जी.टी. श्री. वैष्णव एस. के. श्रीम. कदम ए.एच (संरक्षण अधिकारी) उपस्थीत होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डोंगरदिवे एस.ए.यांनी केले








