काकडेंचा प्रभार फक्त कागदावरच !

Beed

काकडेंचा प्रभार फक्त कागदावरच !

बीडला पूर्ण वेळ वनपरिक्षेत्र अधिकारी हवा

बीड/वार्ताहर 

शासनाकडून कुर्‍हाड बंदी असताना मात्र बीड जिल्ह्यात अवैध लाकूड तोडणाऱ्या मोकाट वावर पाहण्यास मिळत असून प्रभारी अधिकारी काकडे यांचा प्रभार फक्त कागदावरच असल्याचा संशय नागरिकाकडून बोलला जात आहे.

मराठवाड्यात सर्वात कमी जंगल क्षेत्र असलेल्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य लाकूडतोड व्यवसाय फोफावला आहे विशेष म्हणजे कोट्यावधी रुपये महाराष्ट्र शासन बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडी देतो मात्र वृक्ष लागवड होताना दिसत नाही अनेक ठिकाणी फक्त नावालाच वृक्षरोपण केले जाते विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात अवैधपणे बंदी घातलेले झाडांची कत्तले मोठे प्रमाणात होत आहे बीड शहरात एमआयडीसी भागात तर एकाच ठिकाणी 40 पेक्षा अधिक लाकडी मशीन कार्यरत आहे दररोज हजारो टन लाकूड येथे आणला जातो याकडे मात्र बीड वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असून अवैधपणे लाकूड तोडणाऱ्या वर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही एखादी लाकूड वाहतूक करणारी गाडी पकडून त्याचाच उदो उदो केला जातो प्रत्यक्षात मात्र दररोज 50 ते 70 च्या आसपास बीड शहरातूनच वृक्ष तोडण्यासाठी वाहने इतर ठिकाणी जात आहेत काकडे साहेब तुम्ही कोणत्या कामात गुंतला आहात अवैध वृक्षतोडीकडे लक्ष नसल्याने वृक्षतोडीचा व्यवसाय बीडमध्ये प्रचंड प्रमाणात फोफावला आहे.

मराठवाड्यात सर्वात कमी वनक्षेत्र म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते 0.1 या पेक्षाही कमी प्रमाणात बीड जिल्ह्यात जंगल क्षेत्र आहे बीड जिल्ह्यात हजारो एकर जमीन वन विभागाकडे आहे दरवर्षी महाराष्ट्र शासन वन क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करतो मात्र हा सर्व पैसा पाण्यात जातो विविध विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून वृक्षरोपणास बीड जिल्हा मागे पडलेला दिसतो. विशेष म्हणजे बीड शहरात इतर जिल्ह्यातून स्थलांतर होऊन अनेक परवाने कार्यरत आहेत शून्य क्षेत्र जंगल क्षेत्र असूनही बीडमध्ये लाकूड व्यवसायासाठी प्रमाणे का दिले जातात यापेक्षाही स्थलांतरित प्रमाणे दिले गेल्याने बीड शहराच्या एमआयडीसी भागातच 40 पेक्षा अधिक लाकडी मशीन कार्यरत आहे बीड शहरात दररोज हजारो टन लाकूड विविध जातीचे यामध्ये आंबा लिंब यासारखे फळझाडे असलेले व महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या झाडांची कत्तली ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे बीड विभागाचे अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत आहेत. अवैध लाकूडतोड विरोधात बीड वन विभागाने टास्क फोर्स स्थापन करत कारवाई करणे आवश्यक असताना बीड वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे नेमके कोणत्या कामात गुंतले आहेत हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्यातील सर्व माहिती असतानाही कोणाच्या दबावामुळे अवैधपणे लाकूड तोडणार यावर व मशीन चालकावर कारवाई केली जात नाही.

 

 

Sharing

Visitor Counter