धारूरची मिलीया शाळा बंद;फातेमा उर्दु शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार

धारूरची मिलीया शाळा बंद;फातेमा उर्दु शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार
धारूर/प्रतिनिधी
येथील अंजुमन इशात-ए-तालीम संचलीत मिलीया उर्दु प्राथमिक शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिल्यानंतर या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता परंतू मिलीया शाळेतील विद्यार्थ्यांना धारूरमधील फातेमा उर्दु शाळेत समायोजित केल्यामुळे तेथील शिक्षकांनी शिकविण्याचे काम करावे असे आदेश बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांनी काढले आहेत.
धारूर येथील मिलीया उर्दु प्राथमिक शाळे संदर्भातील तक्रारी आल्यानंतर हा वाद बरेच दिवस चालला होता. या प्रकरणात बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मिलीया उर्दु शाळा बंद करण्याबाबत आदेश काढले होते. 10 नोव्हेंबर 2022 पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्या संदर्भात सुचला दिल्या गेल्या होत्या परंतू यामुळे मिलीया शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता परंतू जिल्हा परिषदेने धारूर येथीलच फातेमा उर्दु शाळा येथे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्या संदर्भात आदेश काढले असून तेथील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करावे असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या व्यवस्थापनास व मुख्यध्यापकास काढले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न मिटला असला तरी मिलीया उर्दु प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न मात्र कायम राहणार आहे.








