वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणूक मैदानात

वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणूक मैदानात
प्रत्येक गावात पॅनल देणार-संजय गवळी
परळी/प्रतिनिधी
राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांचे पॅनल उभे करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय गवळी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरली असून परळी तालुक्यातील प्रत्येक गावात योग्य उमेदवारांचे पॅनल उभारणीसाठी चाचपणी चालू असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव ॲड.संजय रोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजीत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू असून इच्छुकांनी 9607020000 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मित्र पक्षांशी युती- आघाडी करण्यास तयार
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार भाजपा, एमआयएम व मनसे वगळता इतर राजकीय समविचारी पक्षांशी युती वा आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे खुले असून याबाबतीत आम्ही चर्चेस तयार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.








