बीडमध्ये रिपाइंचे गायरान धारकांच्या न्यायिक हक्क मागणीसाठी महाधरणे!

बीडमध्ये रिपाइंचे गायरान धारकांच्या न्यायिक हक्क मागणीसाठी महाधरणे!
आक्रमक : आंदोलनास उपस्थित राहण्याचे पप्पू कागदेंचे आवाहन
बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशभरात गायरान धारकांच्या न्यायिक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आंदोलनाची सुरुवात बीडमधून रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सदरील आंदोलन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार (दि.23) रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.
दलित,भुमिहिन,आदिवासी, पारधी,गावकुसां बाहेरील उपेक्षित भूमिहीन लोकांच्या ताब्यात असणाऱ्या गायरान जमिनी शासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. दलित कास्तक-यांना अतिक्रमण काढण्या संदर्भातील नोटीसा दिल्या जात आहेत. परंतु आम्ही सरकारला एक इंचही गायरान जमीन परत घेऊ देणार नाहीत.
त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा,
यासाठी "महाधरणे आंदोलन " करण्यात येणार आहे.
दलित,उपेक्षित समाज कुठेतरी आता स्थिर होवून गायरान जमिनीत कष्ट करुन सामाजिक जीवन जगू लागला आहे.आणि आता जर या लोकांच्या ताब्यातील गायरान जमिनी काढुन घेतल्या तर पुन्हा एकदा हा समाज गुलामागिरीच्या खाईत लोटला जाईल. या सर्व बाबींचा सरकारने विचार करून सुमोटो याचिके विरूध्द रिपीटीशन करावे.
दलित भूमिहीन शेतमजुरांच्या 1990 पासुन ताब्यात असणारी गायरान ह्या त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत. त्याचबरोबर 2010 पर्यंतच्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी देखील रिपाइं पाठपुरावा करत आहे.एवढंच नव्हे तर गायरान जमिनी नावे करण्या संदर्भात सुरुवातीपासूनच दादासाहेब गायकवाड,मंत्री रामदास आठवले यांनी जेलभरो,विविध मोर्चे, आंदोलने यासारखे लढे उभारलेले आहेत.
राज्यातील गायरान जमिनी संदर्भात रिपाइंकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे.
पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित "महाधरणे आंदोलनात" मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राजू जोगदंड, किशन तांगडे, मझहर खान, गोवर्धन वाघमारे, किशोर कांडेकर, अशोक साळवे, अविनाश जावळे, महादेव उजगरे, दिपक कांबळे,दशरथ सोनवणे, अरुण भालेराव, डॉ.नरेंद्र जावळे, धोंडीराम सिरसाठ, महेश आठवले, लक्ष्मण सिरसाठ,अरुण निकाळजे, बापू पवार, दिपक कांबळे, सुभाष तांगडे,बबन मस्के, गौतम बचुटे आदिनी केले आहे.








