“राष्ट्रीय एकात्मता दिन" व "स्व.इंदिरा गांधी जयंती" निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन

Beed

“राष्ट्रीय एकात्मता दिन" व "स्व.इंदिरा गांधी जयंती" निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन

बीड/वार्ताहर

"राष्ट्रीय एकात्मता दिन" व "स्व. इंदिरा गांधी जयंती" निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.  यानिमित्ताने आज झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळेस उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) दयानंद जगताप, तहसीलदार महसूल संतोष बनकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड, शिवशंकर मुंडे तसेच उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Sharing

Visitor Counter