जात पडताळणी विभागाकडे विहित वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जात पडताळणी विभागाकडे विहित वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
जिल्हा जात पडताळणी समिती बीडतर्फे अनु. जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी 12 वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाना-या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे विहित काल मर्यादेत अर्ज सादर करण्याचे] आवाहन जिल्हा जात पडताळणी समिती यांनी केले आहे.
चालू शैक्षणिक वर्षात विशेष मोहिमेच्या अनुषंगाने 11 वी व 12 वी शाखेतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालययीन समान संधी केंद्रामार्फत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारुर यांच्यामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीचे 49 अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र समिती बीड येथे दाखल करण्यात आले आहे. 11 वी व 12 वी शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यानी अर्ज सादर करावेत.
विद्यार्थी व पालकांनी विहित कालपर्यादेत समितीकडे अर्ज सादर न केल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जात वैद्यता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, त्यासाठी विहित वेळेत अर्ज सादर करावेत.








