महिला बेघर निवारा केंद्राचे बांधकाम बोगसच ; मुख्याधिकाऱ्यांकडून आश्रय देण्याचा प्रयत्न !

Beed

महिला बेघर निवारा केंद्राचे बांधकाम बोगसच ; मुख्याधिकाऱ्यांकडून आश्रय देण्याचा प्रयत्न !

बीड/वार्ताहर 

बेघर आणि रस्त्यावर जीवन जगणाऱ्या दुर्बल महिलांना डोक्यावर छत मिळावे म्हणून शासनाने बेघर महिलांच्या निवाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीड येथील निवारा ग्रहसाठी तब्बल दीड कोटी रुपये मंजूर झाले परंतु या निवारा ग्रहाचे बांधकाम मात्र निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसत असून नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे देखील याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे बे सहारा बेघरांचा निकृष्ट दर्जाचा निवारा तयार होईल अशी भीती व्यक्त केली जात असून याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

शासन दुर्बल गरीब बे सहारा निराधार लोकांसाठी वेगवेगळे निर्णय घेऊन त्यांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे देशात अनेक लोक निवारा नसल्याने रस्त्यावर कुठेतरी रात्र काढतात अशा लोकांना संरक्षण मिळावे त्यांनाही जगता यावे या दृष्टिकोनातून बेघरांसाठी निवार्याची संकल्पना अमलात आली माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीडमध्ये जिव्हाळा निवारा ग्रह गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे या निवारागृहामध्ये बे सहारा बेघर लोकांना आधार मिळाला लॉकडाऊनच्या काळात याच निवार्यात अनेकांना दोन वेळचं जेवण आणि डोक्यावर छत उपलब्ध झाला त्यामुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्या मुळे बीडमध्ये महिलांसाठी स्वतंत्र निवारा ग्रह मंजूर झाले महिलांची उचंबना होऊ नये रस्त्यावर उघड्यावर त्यांना राहण्याची वेळ येऊ नये यामुळे हा निवारा ग्रह उभारण्याचा निर्णय झाला परंतु बीडच्या भाजी मंडई मध्ये सुरू असलेले बांधकाम मात्र दर्जाहीन म्हणजेच बोगस होत आहे निवारा ग्रहाच्या इमारतीसाठी बेसमेंट म्हणून चक्क बीड शहरातील नाल्यांमधून निघालेला गाळ टाकला जात आहे कॉलम भरताना वाळू ऐवजी बुकट्टा वापरून हे बांधकाम केले जात असल्यामुळे हा बेघरांचा बे सहारा लोकांचा निवारा बांधकाम दर्जामुळे बे सहारा होतोय की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही नगरपालिकेच्या देखरेखी खाली होत असलेल्या या कामाकडे मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाचेही लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो केवळ गुत्तेदारासाठी ही इमारत उभी करायची आहे की बे सहारा बेघर गरीबांसाठी हा प्रश्न उपस्थित होतो जर गुत्तेदारांवर मुख्याधिकारी किंवा नगरपालिका प्रशासनाचे जास्तीचे प्रेम असेल तर त्यांनी आपल्या खिशातून काही रक्कम गुत्तेदाराला भेट म्हणून द्यावी आणि आपलं प्रेम व्यक्त करावं परंतु गोरगरिबांच्या निवाऱ्यासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर व्हावा नसता नगरपालिकेने बे सहारा लोकांनाही सोडले नाही असाच त्याचा अर्थ निघेल त्यामुळे आता मुख्याधिकारी नसतील लक्ष घालत तर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे विशेष म्हणजे नगर विकास विभाग हा खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे नाईलाजाने याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करावी लागेल.

 

 

Sharing

Visitor Counter