दलित, उपेक्षीत समाजाकडील गायरान जमिनी काढून घेतला तर हा समाज पुन्हा गुलामगिरीच्या खाईत जाईल

Beed

दलित, उपेक्षीत समाजाकडील गायरान जमिनी काढून घेतला तर हा समाज पुन्हा गुलामगिरीच्या खाईत जाईल

शासनाने आपला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा रिपाइं रस्त्यावर उतरेल-पप्पु कागदे

बीड। प्रतिनिधी

दलित, उपेक्षीत समाज गायरान जमिनी कसून, कष्ट करून जीवन जगु लागला असताना शासनाने महाराष्ट्रासह देशभरातील गायरान धारकांवर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं रस्त्यावर उतरेल असा इशारा रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

शासनाने गायरान कसत असलेल्या दलित, भूमिहिन, आदीवासी, पारधी, गावपुसा बाहेरील उपेक्षीत भूमिहिन लोकांच्या ताब्यात असणार्‍या गायरान जमिनी ताब्यात घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह देशभरातील दलित आणि उपेक्षीत समाजावर होणार आहे. गायरान जमिनीच्या माध्यमातून कष्ट करत हा समाज सामाजिक जीवन जगु लागला असताना आता या लोकांच्या ताब्यातील जमिनी काढून घेतल्या तर पुन्हा एकदा हा समाज गुलामगिरीच्या खाईत लोटला जाईल. शासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करावा, सुमोटो याचिके विरोधात रिट प्रिटीशन करावे या मागणीसाठी रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यता आले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर दलित, भूमिहिन, आदिवासी, पारधी आणि गावपुसाबाहेर राहणार्‍या उपेक्षीत समाजाची उपस्थिती होती. यावेळी जर हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर रिपाइं सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल असा इशारा जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

Sharing

Visitor Counter