पिंपरी घाटा येथील सामाजिक कार्यकर्ते बबन वायभासे यांना सरपंच पदासाठी उमेदवारी द्यावी ग्रामस्थांची मागणी

Beed

पिंपरी घाटा येथील सामाजिक कार्यकर्ते बबन वायभासे यांना सरपंच पदासाठी उमेदवारी द्यावी ग्रामस्थांची मागणी

आष्टी/प्रतिनिधी

सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नेते ग्रामपंचायतीच्या तयारीला लागली आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा तडफदार नेतृत्व बबन वायभासे यांना सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी मागणी पिंपरी घाटा येथील सर्वसामान्य जनतेमधून होत असून त्यांनी सामजिक कार्यात पुढाकार घेऊन अनेक चांगले काम आपल्या गावात केले आहे सर्वसामान्याचा प्रश्न सोडवण्याचे काम . नेहमीच बबन वायभासे यांनी केले. काही अडचण असेल तर सातत्याने पाठपुरावा करून मदत मिळून देणार सदैव जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध राहून कुठल्याही प्रकारचा गर्व न करता नागरिकांच्या अडचणी सोडण्यासाठी तत्पर असतो माणूस त्यांच्या जवळ काम घेऊन गेला की ते काम शंभर टक्के होणारच. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अस वाटतेय कि बबन वायभासे यांना एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी. गावा विषयी तन मन धनाने काम करणाऱ्या या ध्येय कार्यकर्ता एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी चर्चा गावातील सर्वसामान्य, गोरगरीब, मजूर आणि ग्रामस्थांमधून होत आहे. होतकरू जर गावाला सरपंच झाला तर गावाचा नक्कीच विकास होईल असा सूर सामान्य जनतेतून होत आहे. गुणवान ओळख असलेला तालुक्यातील सर्वच राजकीय दायी असलेले संबंध व समाजसेवेची आवड असल्यामुळे सर्वसामान्याचे प्रश्न सोडणे आणखीनच सोपे जाईल यात शंका नाही अशी चर्चा रंगू लागली आहे.

Sharing

Visitor Counter