14 कोटी रूपयांचा निधी न.प.कडे वर्ग

14 कोटी रूपयांचा निधी न.प.कडे वर्ग
डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला पालकमंत्र्यांची साद
बीड/प्रतिनिधी
शहरातील विकास कामा संदर्भातील 2021-22 चा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. परंतू ही प्रक्रिया चुकीची असून सदरचा निधी न.प.लाच मिळावा अशी मागणी बीड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी लावून धरल्याने बीडचे पालकमंत्री सावे यांनी 14 कोटी रूपयांचा निधी न.प.कडे वर्ग केला आहे.
या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती, वैशिष्टपूर्ण योजना आदी शहरातील विकास कामांसाठी 2021-22 मध्ये नगरपालिकेला निधी मंजूर झाला होता. परंतू हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला गेला होता. या प्रकरणी बीड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी नगरपालिका सक्षम असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करणे उचित नसल्याचे पालकमंत्री सावे यांच्या निदर्शनास आणून देत सदरचा निधी बीड नगर परिषदेकडे वर्ग करण्या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे 14 कोटी रूपयांचा हा निधी बीड नगर परिषदेला वर्ग करण्यात आला असून यामुळे आता प्रस्तावित असलेली आणि निधी अभावी रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.








