इज्तेमागाहची काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्याकडून पाहणी;आयोजन समितीने मानले आभार 

Beed

इज्तेमागाहची काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्याकडून पाहणी;आयोजन समितीने मानले आभार 

बीड/प्रतिनिधी

शहरातील अहेमदनगर रोडवर दिनांक ८ व ९ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय इज्तेमासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. इज्तेमा होत असलेली जागा व सुरू असलेल्या मंडप उभारणीची पाहणी करण्याकरिता बीड जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा काँग्रेस आयचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी भेट दिली असता त्यांना आयोजन समिती च्या जबाबदारांनी इज्तेमा, इज्तेमागाह आणि मंडप उभारणीच्या सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती देऊन त्यांनी जातीने येऊन भेट देत पाहणी केल्याबद्दल आयोजन समितीने आभार व्यक्त केले.

         बऱ्याच काळानंतर बीड शहरात दोन दिवसीय मोठा इज्तेमा आयोजित करण्यात आला आहे. इज्तेमासाठी दूरदूरून मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येत मुस्लिम बांधवांची राहणारी उपस्थिती लक्षात घेता तेवढ्याच मोठ्या प्रमाणात इज्तेमाचे आयोजन करण्यात येत आहे. जागेचे सपाटीकरण करून झाल्यानंतर आता मंडप उभारणीचे कार्य सुरू आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी स्वतः जातीने येऊन भेट देत पाहणी केली. आयोजन समितीने त्यांना इज्तेमा व इज्तेमासाठी सुरू असलेल्या तयारीबद्दल माहिती दिली. देशमुख यांनी पाहणी करून म्हटले की, काँग्रेस पक्षही आपल्या सोबत आहे. इज्तेमासाठी जे काही कार्य पक्ष करू शकत असेल तर अवश्य करू. यावर आयोजन समितीने त्यांचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन, काँग्रेस आहे पक्षाचे बीड शहराध्यक्ष परवेज भैय्या कुरेशी, जब्बार भाई, अतिख़ भाई, जकियोद्दीन, शेख सलीम, जाकीर भाई, गणेश बजगुडे यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी व कार्य करणारे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

Sharing

Visitor Counter