शालेय क्रिकेट च्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूल विजयी 

Beed

शालेय क्रिकेट च्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूल विजयी 

बीड/

२५ नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रिकेटच्या तालुका स्तरीय शालेय स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील आठ संघाने सहभाग नोंदवला. या शालेय तालुकास्तरीय क्रिकेटच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी संजय धस सर, अझहर सर, अभिजीत तांदळे , सचिन गायकवाड सर, संतोष कवठेकर,रामदास गिरी, तनवीर पठाण सर अन्य प्रशिक्षक व पंच,अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाले.या स्पर्धेमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या, १४ वर्ष खालील मुलांच्या संघाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम सामन्यात पोतदार इंग्लिश स्कूल ला मात देत विजय मिळवला. तसेच सेमी फायनल चंपावती विद्यालया सोबत झाली धैर्यशील शिंदे व आरशान पठाण यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत गुरुकुल इंग्लिश स्कूल ला विजय मिळवून दिला. तसेच फायनल सामना गणेश विद्यालय सोबत झाला गणेश विद्यालयने गुरुकुल इंग्लिश स्कूल ला 28 धावाचे टार्गेट दिले होते. गुरुकुल इंग्लिश स्कूल ने फक्त चार ओव्हर मध्ये टारगेट पूर्ण केले व दणदणीत विजय मिळवला हा फायनल सामना पाहण्यासाठी गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शितल सर्वज्ञ सर निशांत घुगे सर स्वतः उपस्थित होते या विजयी संघामधील खेळाडू कर्णधार धैर्यशील शिंदे, आरशान पठाण,मानस शिंदे, यश रेंगे , अन्वित सुबेदार,तुषार बांगर, नारायण घोडके, संग्राम बडे, सक्षम वारंगुळे, आयुष जाधव , सार्थक कोकरे यशवर्धन सांगळे या सर्व विजयी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक रामदास गिरी यांचे मार्गदर्शन लाभले हे सर्व विजयी झालेले गुरुकुल इंग्लिश स्कूलचे खेळाडू आंबेजोगाई येथे होणाऱ्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत बीड तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील . या यशाबद्दल गुरुकुल इंग्लिश स्कूलचे अध्यक्षा डॉ. विनिता ढाकणे, सचिव डॉ. राजेंद्र ढाकणे, कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे, प्राचार्य शितल सर्वज्ञ, उप प्राचार्य अमोल कपूर, सारा मॅम,गणेश इंगोले,क्रीडा प्रशिक्षक कल्याण माने, रामदास गिरी, जालिंदर नागरगोजे, आफरान शेख, सुरेखा वाघमारे, सर, सानप सर, अन्य प्रशिक्षक व पालकांनी विजय मुलांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Sharing

Visitor Counter