पाईपच्या कारखान्याला आग पंधरा ते वीस लाखाचे नुकसान

पाईपच्या कारखान्याला आग पंधरा ते वीस लाखाचे नुकसान
बीड/प्रतिनिधी
बहीरवाडी शिवारात असलेल्या रबरी पाईपच्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये मशिनरी, कच्चा माल जळून खाक झाला असून या आगीमुळे जवळपास पंधरा ते वीस लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे कारखाना बंदीस्त जागेत नसल्यामुळे कारखान्याला विमा कवच देखील नव्हते.
या बाबत अधिक माहिती अशी की, बहीरवाडी शिवारात बायपास पासून काही अंतरावर ऋषीकेश विजयकुमार सोनी यांची विजय पाईप्स नावाने कारखाना आहे. गेल्या दहा वर्षापासून या कारखान्यात रबरी एस.डी.पी.पाईप बनवला जातो. मोठ्या शेडमध्ये पाईप तयार करण्यासाठी लागणार्या 2 गट्टा मशिन अंदाजीत किंमत सहा लाख रूपये, झटक मशिन अंदाजीत किंमत 2 लाख रूपये आणि पाईप बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल 25 ते तीस टन अंदाजित किंमत आठ ते दहा लाख हे साहित्ये जाळीचे सेड आणि वरती पत्रे असलेल्या कारखान्यात होते. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्कीट होवून थिनग्या पडल्याने कच्या मालाने पेट घेतला. यावेळी सात ते आठ कामगार कारखान्याजवळ असलेल्या खोलीत झोपलेले होते या कामगारांपैकी एकाला आग लागल्याचे लक्षात आल्याने सर्वजन उठले आणि पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. परंतू पाणी फेकल्यावर शॉक लागत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर पालिकेच्या अग्नीशामक दलाला कळविण्यात आले. न.प.च्या दोन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची एक गाडी अर्ध्या तासाने आली परंतू तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. कच्च्या मालात प्लास्टीक असल्याने काळ्या धुराचे लाळ दिसत होते. एक ते दीड तासाने आग अटोक्यात आली परंतू तोपर्यंत मशिनरीसह कच्चामाल जळून खाक झाला होता. विशेष म्हणजे कारखाना बंदीस्त जागेत नसल्यामुळे कारखान्याला विम्याचे कवच नव्हते.
आयआरबीची चुक; सोनी यांचे नुकसान
कृषी उत्पन्न बाजार समितीपासून अवघ्या एक किलोमिटर अंतराच्या आत विजय पाईप्स हा कारखाना आहे. आगीची माहिती मिळाल्यावर अवघ्या पाच मिनिटात अग्नी शामक दलाची गाडी घटनास्थळी आली असती परंतू आयआरबी जे बायपासच्या बाजुने असलेला रस्ता तयार न केल्यामुळे आठ ते दहा किलोमिटरचे अंतर पार करून अग्निशामक दलाच्या गाड्यांना जिरेवाडीकडून घटनास्थळी जावे लागले यामुळे पाच मिनिटात येणारी गाडी अर्ध्या तासाने आली तोपर्यंत संपूर्ण कारखाना आगीत जळून खाक झाला.








