शहीद टिपू सुलतान जयंती व सविधान दिन निमित्त प्रा. प्रदीप साळुंखे, व शेख सुभानअली यांचे व्याख्यानांचा कार्यक्रमाचे आयोजन

शहीद टिपू सुलतान जयंती व सविधान दिन निमित्त प्रा. प्रदीप साळुंखे, व शेख सुभानअली यांचे व्याख्यानांचा कार्यक्रमाचे आयोजन
सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
किल्ले धारूर/प्रतिनिधी
धारूर येथे दिनांक 27/11/2021 रोजी ह. टिपु सुलतान जयंती उत्सव समीती किल्ले धारूरच्या वतीने शहीद टिपु सुल्तान जयंती व सविधान दिन निमित्त व्याख्यानांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .
टिपू सुलतान जयंती उत्सव समीतीच्या वतीने व्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक 27/11/2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स समोर, वेळ सायं. 06:00 वाजता धारूर येथे होणार आहे, या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध सुप्रसिद्ध -शिव-शाहू फुले आंबेडकर, विचारवंत, समाज प्रबोधनकार प्रा. प्रदीप साळुंखे, व शेख सुभानअली, अध्यक्ष-दंगा-मुक्त महाराष्ट्र मिशन, उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमला धारूर शहरातिल व तालुक्यातील सर्व समाजिक संघटना, राजकीय पदअधिकारी, कार्यकरते, व धारूर शहरातिल नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन टिपू सुलतान जयंती उत्सव समिती किल्ले धारूर तर्फे करण्यात आली आहे.








