कर्तृत्वान तलाठी शितल चाटे यांचा भूषण पुरस्काराने गौरव

Beed

कर्तृत्वान तलाठी शितल चाटे यांचा भूषण पुरस्काराने गौरव

पद्मभूषन पोपटराव पवारांच्या हस्ते पुण्यात झाल्या सन्मानित

बीड/प्रतिनिधी

प्रशासनाच्या कणा असलेल्या महसूल विभागाचे तलाठी हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. शेतीबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेत त्यांतून मार्ग काढून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असलेल्या नाळवंडी सज्जाच्या कर्तृत्वान तलाठी शितल चाटे यांचा पद्मभूषन पोपटराव पवारा यांच्या हस्ते पुण्यामध्ये जिल्हा भूषण पुरस्काराने गौरव करत सन्मानित करण्यात आले.

यावेळी ते करत असलेल्या कार्याचा तसेच गोरगरिब शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायम असलेल्या तत्परतेमुळे आणि त्यांच्या कामातील एकाग्रता, कर्तव्यदक्षाता तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल ग्लोबल स्कॉलसर्र् फाऊंडेशन पुणे संस्थेचा राष्ट्रीय भुषण पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदीर पुणे येथे पद्मभूषन पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करत गौरव करण्यात आला. नाळवंडी सज्जावर काम करत असतांना अनेक संकटाशी त्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र त्या संकटांना न घाबरता, न डगमगता खंबीरपणे लढा देत शेतकर्‍यांच्या हितासाठी कायम काम करत असल्याने त्यांचा सन्मान केला गेला आहे. शेतकर्‍यांबद्दल असलेली कणव तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी, शेतकर्‍यांच्या न्यायासाठी कायम काम करून त्या कामातून जनसेवेत भूषण प्राप्त केलेल्या तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कार्यालयातील सहकारी वरिष्ठ, अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक त्याचबरोबर मित्र मैत्रीण यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.

Sharing

Visitor Counter