आ.सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल!

Beed

आ.सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल!

बीड/वार्ताहर

इनामी जमीन बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी नवीन नवीन खुलासे समोर येत आहे तर याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत.आष्टी तालुक्यातील कथित आठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी अखेर भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करीत आहेत. खाडे यांच्याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. खाडे यांनी आपल्या तक्रारीत आ. सुरेश धस यांचे नाव घेतलेले असल्याने आ. सुरेश धस यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत आ. सुरेश धस यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, तक्रारदार राम खाडे यांची १३ जानेवारी २०२२ ची तक्रारच एफआयआर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्यानुसार २९ रोजी कलम १३ (१) (अ) (ब), १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ सह कलम- ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) १०९ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.

Sharing

Visitor Counter