“ जात पडताळणी कार्यालयाच्या वतीने “सामाजिक न्याय पर्व” च्या अनुषंगाने महाविद्यालयात विशेष शिबीर

Beed

“ जात पडताळणी कार्यालयाच्या वतीने “सामाजिक न्याय पर्व” च्या अनुषंगाने महाविद्यालयात विशेष शिबीर

जात वैधता प्रमाणपत्र वाटप व महाविद्यालयात स्विकारले जाणार जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव”

बीड/वार्ताहर 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाने दि.26 नोव्हेंबर 2022 ते दि.06 डिसेंबर 2022 या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व” म्हणून साजरा करण्यात येत आहे, त्यानिमित्त ज्या 11 वी 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले नाहित अशा विद्यार्थी यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फ़त दि.05 डिसेंबर 2022 ते दि.09 डिसेंबर 2022 या कालावधीत तालुकानिहाय महाविद्यालयात समितीचे कर्मचारी उपस्थित राहणार असुन महाविद्यालयातील प्राचार्य / प्रतिनिधी मार्फ़त तालुक्यात इ. 11 वी व 12 विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करावेत जेणेकरुन विद्यार्थी वंचित राहु याची दक्षता संबंधित महाविद्यालयाने घ्यावी.  

 समितीचे कर्मचारी नमुद तारखेस खालीलप्रमाणे महाविद्यालयात उपस्थित राहणार आहेत:-

 

1)05.12.2022 =अंबाजोगाई =योगेश्वरी महाविद्यालय,अंबाजोगाई

2)06.12.2022=बीड =बंकटस्वामी महाविद्यालय, बीड 

3)07.12.2022=केज,धारुर=वसंत महाविद्यालय, केज 

4)08.12.2022=बीड, गेवराई =बंकटस्वामी महाविद्यालय, बीड

5)09.12.2022=वडवणी =स्वामी विवेकानंद माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, वडवणी 

नमुद कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष शिबीर राबविण्यात येत असुन संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter