श्रीमती सुषमा लक्ष्मण काकडे यांची राज्यकर निरीक्षक वर्ग 2 अधिकारी पदी निवड

Beed

श्रीमती सुषमा लक्ष्मण काकडे यांची राज्यकर निरीक्षक वर्ग 2 अधिकारी पदी निवड

बीड/वार्ताहर

डी एड नंतर शिक्षक भरती निघत नसल्या कारणाने कोणतेही क्लास न लावता बार्शी मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची पुस्तके विकत घेऊन वडिलांना शेतीच्या कामात मदत करुन घरूनच चा अभ्यास केला. व 2016 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत मंत्रालय मुंबई येथे मंत्रालयीन क्लर्क पदी निवड झाली. अभ्यास चालूच होता व पुढच्या वर्षी 2017 मध्ये वस्तू आणि सेवा कर सहाय्यक पदी निवड झाली. मुळ गाव चांदणी ता परंडा जि.उस्मानाबाद,2019 मध्ये येळंब घाट जि. बीड येथील रविकांत कदम यांच्याशी विवाह झाल्यानंतर बीडची सून झाल्या.

शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीत अभ्यासची चिकाटी आणि जिद्द जोरावर आज राज्यकर निरीक्षक (STI) वर्ग 2 अधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे. या यशासाठी माहेर व सासर दोन्ही कुटुंबाना त्यांच्या मेहनतीचा अभिमान वाटतो व पदोन्नती मुळे दोन्हीं कुटुंब आनंदी झाली आहे. सर्व मित्र व कुटुंबियांकडून कौतुक करून भरबरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter