बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त महिलांना सन्मान पत्र वाटप

बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त महिलांना सन्मान पत्र वाटप
बीड/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण लोकनेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा एक कुटुंब म्हणून चालवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत यामध्ये आपल्या नेत्या आदरणीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 22 व्या वर्धापन दिनानिमित्त औचित्य साधून आमच्या मार्गदर्शिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सौ रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना पार्श्वभूमीवर ज्या महिलांनी आपल्या घरादाराची पर्वा न करता कोरोना लोकांची आणि त्या कालावधीमध्ये आपापल्या फील्डमध्ये उत्तम रित्या कामगिरी केली त्यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे *मर्दानीमहाराष्ट्राची* असे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये बीड जिल्ह्यातील डॉक्टर, नर्स ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स ,पोलीस अधिकारी. या महिलांचा सन्मान करण्यात आला
त्यावेळी सौ प्रज्ञा खोसरे( प्रदेश सरचिटणीस) सौ माधुरीताई घुमरे( शहराध्यक्ष बीड) युवती जिल्हाध्यक्ष प्रियाताई डोईफोडे उपस्थित होत्या. ताईसाहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अगदी उत्तम रित्या कार्यक्रम पार पाडण्यात आला








