ॲड. शेख शफीक भाऊ यांचा सिरसाळा व परळी दौरा संपन्न

ॲड. शेख शफीक भाऊ यांचा सिरसाळा व परळी दौरा संपन्न
परळी/प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष
ॲड. शेख शफीक भाऊ यांचा सिरसाळा व परळी तालुका दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
या दरम्यान सिरसाळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदा सहीत वार्डातील उमेदवारांचे नामनिर्देशन फार्म भरण्यात आले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुद्धा सिरसाळा गाव विकासापासून वंचित आहे. या भागाचा विकास करण्याची व चेहरा-मोहरा बदलण्याचे कार्य फक्त एआयएमआयएम पक्षच करू शकतो. यासाठी मतदारांनी एआयएमआयएम च्या सर्व उमेदवारांना निवडून सत्तेत संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले. सरपंच पदाचे उमेदवार तुकाराम पवार आणि सर्व उमेदवांरानी जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांचा सत्कार केला. यावेळी परळी तालूकाध्यक्ष शेख शरीफ भाई, जिल्हा समन्वयक सय्यद सैफ अली उर्फ लालू भैय्या, ज्येष्ठ नेते सय्यद जमील अध्यक्ष,
न.से. ताज खान पठाण, न.से. विश्वनाथ देवकर, नेते शेख मुस्तफा भाई, माजी तालुकाध्यक्ष कादर कुरेशी, कार्याध्यक्ष फेरोज खान उर्फ जनाब, युवानेते शेख तौहीद, शेख अनवर भाई, शाहरुख पठाण, शेख मोहसीन, एजाज़ खान, शेख तौफीक, सय्यद रियाज, शेख फरहान, शेख अनवर, जुम्मन पठाण सह अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या धामधुमीतही भाऊंचे सामाजिक भान
परळीतील प्रतिष्ठित व्यापारी तसेच ओबीसी नेते शेख मनसब भाई कलईकर यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांना गुट्टे हाॅस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही बाब जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊंना कळताच त्यांनी प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेत तबीयतीची विचार पूस केली. यावेळी सोबत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एआयएमआयएम पक्ष फक्त मुस्लिमांपुरता मर्यादित नाही
एआयएमआयएम पक्षाच्या नावात भलेही मुस्लिम शब्द असला तरी पक्ष फक्त मुस्लिमांपुरता मर्यादित नाही. हे पक्षाने सिरसाळा येथे मुस्लिमेत्तर उमेदवार तुकाराम पवार यांना सरपंच पदासाठी उमेदवारी देऊन दाखवून दिले आहे.
शफीक भाऊंनी सर्वांना भेट देऊन केली चर्चा
सिरसाळा ता. परळी येथे ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेट देऊन सर्वांशी चर्चा केली. यावेळी सिरसाळा शहराध्यक्ष जुम्मन पठाण, सरपंच पदाचे उमेदवार तुकाराम बाप्पू पवार, वार्ड क्रमांक ४ चे शेख अन्वर, वार्ड क्रमांक ५ चे सय्यद फरहान असद अली, शफीक खान रशीद खान, वार्ड क्रमांक ६ चे सय्यद रियाज सय्यद युनूस, पठाण, सय्यद मोईन सय्यद मशाक सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








