अनाथांचे आधार ठरलेल्या, जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या मदतीसाठी पुढाकाराची भूमिका राहील-श्री. सत्यनारायणजी लाहोटी

Beed

अनाथांचे आधार ठरलेल्या, जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या मदतीसाठी पुढाकाराची भूमिका राहील-श्री. सत्यनारायणजी लाहोटी

अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने बेघर,अनाथांच्या हस्ते ७५ दिवे प्रज्वलित करून वाढदिवस साजरा

बीड/वार्ताहर

दिनांक 13 प्रतिनिधी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा, या संत वचनाप्रमाणे बीड शहरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात अनेक विकलांग, अनाथ, वृद्ध, घरातून टाकाऊ झालेले परिस्थितीने गांजलेले असे अनाथ लोक येथे पहावयास मिळाले. त्यांचे दुःख आणि व्यथा पाहून मन काही वेळा हळूहळून गेले. आपल्या कुटुंबापासून मायेने पोरके झालेल्या या अनाथ लोकांना जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात खऱ्या मायेची ऊब येथे पहावयास मिळाली येथील निवारा केंद्राचे कार्य आज पर्यंत मी ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला येथील नियोजन आणि अनाथालयात असलेल्या अनाथा प्रति असलेली जिज्ञासा, प्रेम पाहून समाधान वाटले आज अमृत वर्षा निमित्ताने येथील बेघर,अनाथांनी माझ्या वाढदिवसानिमित्त 75 दीप प्रज्वलित करून मला पुढील काळातही काही करण्याची प्रेरणा मिळाली येथील जिव्हाळा निवारा केंद्रासाठी मला जी मदत करणे शक्य आहे ती तर मी करणारच आहे पण अनेक दात्यांना या जिव्हाळा निवारा केंद्र येथील वृद्धांसाठी अनाथांसाठी काही क्षण काढून येथे भेट देण्याचे मी या निमित्ताने आवाहन करीत असल्याचे प्रतिपादन आदरणीय श्री. सत्यनारायणजी लाहोटी यांनी प्रतिपादन केले.

श्री. सत्यनारायणाची लाहोटी यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने महात्मा फुले व्यापारी संघटना भाजी मंडई तसेच जिव्हाळा निवारा केंद्र बीडच्या वतीने श्री. सत्यनारायणजी लाहोटी यांचा येथील वृद्ध, अनाथ, विकलांग लाभार्थ्यांच्या हस्ते 75 दीप प्रज्वलित करून तसेच येथील अनाथांना भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार व त्यानंतर मिष्ठांन्न भोजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संपादक श्री.गंमत भाऊ भंडारी महात्मा फुले भाजी मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भास्करराव जाधव सचिव तुकाराम जी साळुंके, उपाध्यक्ष प्रकाश शेठ कोटेच्या, कैलासजी वीर, विलास आप्पा बेदरकर, यांच्या सह जिव्हाळा बेगर निवारा केंद्राचे मुख्य व्यवस्थापक राजू वंजारे संचालक अभिजीत वैद्य, शालिनी परदेशी, यश वंजारे, कल्याण गोरे आदींच महात्मा फुले व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य परिसरातील नागरिक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

पुढे बोलताना श्री.लाहोटी म्हणाले की हल्लीच्या काळात माणुसकी धर्म लोप पावत असून घरातील जेष्ठ मंडळी अनेक ठिकाणी बोज, अडगळ वाटू लागली आहेत पण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जेष्ठान शिवाय घराला घरपण नाही त्यामुळे घरातील जेष्ठ मंडळींचा आदर करण्याची गरज आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त येथील व्यापारी बांधवांनी जिव्हाळा निवारा केंद्रातील संचालकांनी जो माझा सत्कार केला तो कायम लक्षात राहण्याजोगा आहे भाजी मंडई परिसरात अगदी मध्यवर्ती असलेले जिव्हाळा बेघर निवारा केंद्र अनेक दानशूरांना समाधान आणि आनंद प्राप्त करून दिल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे अनेक दानशोरांनी जी जी शक्य आहे ती मदत मग ती धान्य स्वरूपात असो की नगदी स्वरूपात आपल्या ऐपती प्रमाणे येथील अनाथांसाठी मदतीचा हात पुढे करावा असे मी या निमित्ताने नम्र आवाहन करतो असे ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी संपादक श्री.गंमतजी भंडारी महात्मा फुले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भास्कर जी जाधव,तुकारामजी साळुंखे प्रकाश शेठ कोटेचा, कैलास शेठ वीर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सत्यनारायण भाऊंना अमृत वर्षा निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे मुख्य व्यवस्थापक राजूजी वंजारे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून अनाथांचे आधार केंद्र म्हणून जिव्हाळा बेघर निवारा केंद्र भाजी मंडई परिसरात कार्यरत असून मागील काही महिन्यांपासून शासनाच्या धोरणात बदल झाल्या कारणाने अनेक खर्चात कपात करण्यात येत असून शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे शहरातील दानशूरांना अनाथांचे पालकत्व स्वीकारल्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे अगदी एक किलो धान्यापासून ते अगदी एक रुपयाच्या नाण्यापासून जी शक्य आहे ती मदतीसाठी पुढे यावे असे मी या निमित्ताने आवाहन करतो आम्ही व्यवस्थापक म्हणून त्यांच्या रोजी रोटी ची जबाबदारी पार पाडतच आहोत पण पण आपण दिलेल्या दानातून अनेक बेघर लाभार्थ्यांना दोन वेळे चे अन्न त्यांच्या पोटात जाण्यासाठी आपल्या बीडकर दात्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका माऊली सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य यांनी केले तर आभार जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या संचालिका शालिनी परदेशी यांनी मानले या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सदस्य बेघर निवारा केंद्रातील महिला पुरुष लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter