श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या 2023 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे गुरुवर्य महंत ह.भ.प. श्री शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या हस्ते प्रकाशन

Beed

श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या 2023 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे गुरुवर्य महंत ह.भ.प. श्री शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या हस्ते प्रकाशन

बीड/वार्ताहर

बीड जिल्ह्यातील नावाजलेल्या श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी ली बीड च्या 2023 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे गुरुवर्य महंत ह.भ.प.श्री शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या हस्ते दि 11 डिसेबर 2022 रोजी प्रकाशन करण्यात आले. 10 वर्षांपूर्वी 2013 ला श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी स्थापन केलेल्या श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचा आज वटवृक्ष झालेला आहे. विद्यार्थी, शेतकरी, युवा उद्योजक, तसेच मयत खातेदार यांच्या वारसांना श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट मदत करत आलेली आहे व आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आलेली आहे याचा आढावा या दिनदर्शिकेत घेण्यात आला. यावेळी बळीआप्पा गवते (युवा उद्योजक), संस्थेचे सि.ई.ओ. विनायक (भैय्या) परभणे, जनरल मॅनेजर तळेकर डी.बी.,जनरल मॅनेजर लाटे एस.व्ही.,मॅनेजर तकिक के.ए.,वरपे ए. एस.,माने आर.एस.आदी मान्यवर उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter