जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Beed

जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 बीड/वार्ताहर 

ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून बीड जिल्ह्यातील 704  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मदान होणार आहे व मंगळवार दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळे पुवीच्या 48 तासामध्ये मद्य विक्री करण्यात मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी)  नुसार तरतुद करण्यात आली आहे. या शिवाय मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्यचे बंधनकार आहे.

    पुढील नमूद नियमावली अंतर्गत मद्य विक्री निवडणुक मतदार प्रक्रिये दरम्यन बंद करण्याबाबत देखील तरतूद आहे. महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियम 1969, महाराष्ट्र देशी दारु नियम 1973, विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952, ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) 1968 आहे. मतदान प्रक्रिया व मतमोजणी संबंधाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-2 सीएल-3, बियर शॉपी, ताडी आदी अनुज्ञप्ती दि. 16 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून 18 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यत आणि दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

            बंद कालावधीत बीड जिल्हयातील 704 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्या अनुज्ञप्ती आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबधित अनुज्ञप्ती धारकांची ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द  करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत नमूद तरतुदीनुसार संबंधित अनुज्ञप्तीधारकावर कारवाई करण्यात येईल. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी, राधाबिनोद शर्मा बीड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Sharing

Visitor Counter