शहरातील अट्टल खंडणी बहाद्दर गुंडाची MPDA कायद्या अंतर्गत हर्सुल कारागृहात रवानगी

शहरातील अट्टल खंडणी बहाद्दर गुंडाची MPDA कायद्या अंतर्गत हर्सुल कारागृहात रवानगी
बीड/वार्ताहर
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरून पोलीस निरीक्षक श्री. रवि सानप पोलीस ठाणे बीड शहर यांनी दिनांक 17/11/2022 रोजी इसम नामे शेख एजाज शेख अमजद वय 25 वर्ष रा. नाळवंडी नाका, पेठ बीड ता. जि.बीड याचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे बीड शहर, पो. स्टे. कळंब, पो. स्टे. आनंदनगर उस्मानाबाद येथे खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, जिवे मारण्याची धमक्या देणे, शिवीगाळ करणे, अवैदय शस्त्र बाळगणे, नुकसान करणे, रस्ता आडविणे, शस्त्राचा धाक दाखविणे वगैरे स्वरुपाचे 07 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी एका गुन्ह्यात मा. न्यायालयाने सदर स्थानबध्द इसमास 5 वर्षाची शिक्षा ठोठावली असुन 04 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 02 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. सदरील इसम हा बीड शहरात व्यापाऱ्यांना धमक्या देवुन त्यांचे कडून खंडणीची मागणी करत होता तसेच शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासुन करडी नजर होती. सदर इसमावर यापुर्वी CrPC 110 व कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता. त्याची बीड शहरात दहशत आहे. त्याचे विरुध्द लोक फिर्याद देण्यास समोर येत नाहीत.
सदर प्रकरणात श्री. राधाबिनोद अ. शर्मा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 19.12.2022 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी. डी. ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र. 2022 /आरबी डेस्क- 1/पोल-1/ एम.पी.डी.ए 09 दिनांक 19.12.2022 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो.नि. श्री. रवि सानप पो.स्टे. बीड शहर यांना दिल्या होत्या. त्यांनी पो. नि. श्री. सतीष वाघ, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या गोपनिय खबऱ्याचे आधारे ताबे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने सदर स्थानबद्ध इसमास ताब्यात घेतले पोलीस ठाणे बीड शहर येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, औरंगाबाद येथे दिनांक 20.12.2022 रोजी 03.15 वा. हजर करुन स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर, उपविपोअ बीड श्री. संतोष वाळके, पो.नि. श्री. सतीष वाघ, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि रवि सानप, सपोनि अंतराप, दराडे, पो. ना अविनाश सानप, सुशेन पवार बीड शहर व बीड स्थागुशा चे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, मनोज वाघ, शेख नसीर यांनी केलेली आहे. भविष्यातही हातभट्टीची दारु तयार करणारे, विक्री करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.








