स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करा

स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करा
करिअर : बार्टी केंद्रात जेलर गंगाधर वडणे यांचे प्रतिपादन
बीड / प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना, प्रामाणिकपणे अभ्यास करणे महत्वाचे आहे. तरच विद्यार्थी स्वतःला सिद्ध करु शकतो. कारण कोणतेही यश मिळवण्यासाठी सातत्य आणि जिद्द,चिकाटी असावी लागते. असे प्रतिपादन बीड कारागृहाचे जेलर गंगाधर वडणे यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना व्यक्त केले.
बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जेलर गंगाधर वडणे बोलत होते. यावेळी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे,जेष्ठ साहित्यिक केशव वाघमारे, पत्रकार सुनिल डोंगरे, जिल्हा न्यायालयाचे डॉ.रविंद्र वाघमारे, उद्योजक गोरख वाघमारे, एपीआय पार्टीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन जवंजाळ, माजी कनिष्ठ अभियंता उमाजी आठवले, प्रा.बाळासाहेब जावळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जेलर गंगाधर वडणे म्हणाले की, बीड सारख्या ठिकाणी राहुल वाघमारे यांनी एक अतिशय दर्जेदार केंद्र उभारुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या माध्यमातून एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रातून आगामी काळात अनेक विद्याथी घडतील. विद्यार्थांनी या संधीचे सोने करुन आपले करिअर घडवावे. असे मत विस्तार जेलर गंगाधर वडणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.भरत खेत्री, प्रस्ताविक प्रा.अमोल क्षीरसागर, आभार केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, ग्रंथपाल सचिन काकडे, सहाय्यक प्रा.अर्चना आठवले,वरिष्ठ लिपिक विनोद जोगदंड, कनिष्ठ लिपिक दिलीप गायकवाड, व्हिडीओ ग्राफर राहुल शिंदे, सहाय्यक दीपक वाघमारे,सहाय्यक गजानन खेत्रे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले








