साबला ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी सौ.जनाबाई नरहरी काकडे यांचा विजय

साबला ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी सौ.जनाबाई नरहरी काकडे यांचा विजय
केेज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील साबला ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार सौ.जनाबाई नरहरी काकडे यांच्यासह चार उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.
मंगळवार दि.20 रोजी जाहिर झालेल्या निकालात सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांच्यासह सदस्य म्हणुन आश्रोबा मोतीराम काकडे, प्रतिभा पोपट काकडे, ज्ञानेश्वर श्रीकृष्ण पंचाळ, कचराबाई राजेंद्र सरोदे या सर्व बहुमताने विजय झाले आहेत.निकालानंतर विजयी उमेदवार व गावकर्यांनी साबला येथे विजयोत्सव साजरा केला.
नंदकिशोरजी मुदडा यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचे अभिनंदन केले असून, या विजयाचे शिल्पकार नरहरी काकडे यांचेही विशेष कौतुक केले आहे, तसेच आगामी काळात गावच्या सर्वांगीण व सर्वंकष विजयासाठी उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गावकऱ्यांनी फुलांचा व गुलालचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या.








