जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 28 डिसेंबरला बैठक

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 28 डिसेंबरला बैठक
बीड/वार्ताहर
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दि. 28 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सूचनांनुसार शासकीय कर्मचाऱ्यांविरुध्द प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी बीड जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांविरुध्द भ्रष्टाचारासंबधी तक्रार असल्यास समितीसमोर व्यक्तिश: उपस्थित राहून पुराव्यासह लेखी स्वरुपात मांडाव्यात, असे आवाहन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे. तक्रारीसोबत पुरावे जोडले गेले नसल्यास अशा तक्रारी समितीमध्ये घेतल्या जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.








