लहानपणापासून अभ्यासाची गोडी लावा,मोबाईल पासून लहान मुलांना दूर ठेवा हे हिताचे-रावसाहेब चक्रे

लहानपणापासून अभ्यासाची गोडी लावा,मोबाईल पासून लहान मुलांना दूर ठेवा हे हिताचे-रावसाहेब चक्रे
रमाई नगर तेथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप अभियान
बीड/प्रतिनिधी
आजकाल लहानपणा पासून मुलांच्या हातात मोबाईल दिसून येतो त्यामुळे मुलांच्या दृष्टीवर, बुद्धिमत्तेवर, स्मरणशक्तीवर, मेंदूवर दुष्परिणाम होतो. मैदानी खेळापेक्षा मुलांचा वेळ मोबाईल मधील विविध प्रकारच्या खेळात, पब्जी सारख्या गेम मध्ये जातो, स्वभावात चिडचिडापणा येतो व शरीर प्रकृती देखील मैदानी खेळाच्या अभावामुळे सुदृढ राहत नाही. त्यांना लहानपणा पासून अभ्यासाची गोडी लागावी म्हणून वही-पेन व महापुरुषांचे जीवन चरित्र देऊन वाचून दाखवून वाचून दाखवून महापुरुषांचा आदर्श डोळ्या समोर सतत ठेवावा, ह्यातच विद्यार्थ्याचे हित आहे.असे रावसाहेब चक्री यांनी प्रतिपादन केले.
महामानवा अभिवादन ग्रुप,वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय, सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजे 6 डिसेंबर 2022 रोजी केलेल्या आव्हानानुसार मिळालेल्या वही पेन दान अभियानातील 4 फेरीतील, रमाबाई नगर चौक, खंडेश्वरी परिसर येथील 74 विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी अध्यक्ष पदावरून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना रावसाहेब चक्रे पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य, एकाग्रता व ज्ञान मिळवण्या बरोबरच प्रकृती स्वास्थ्याचे महत्त्व उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अभ्यासात चिकाटी नियमितता व ध्येय गाठण्याकरता प्रयत्न याची जोड देणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. जी. वानखेडे यांनी केले व सुमारे 800 गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात येईल असे सांगितले. यावेळी महामानवा अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले,अनिल वीर, गोदावरी पटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन काशिनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास उपासिका ज्योती शिरसाठ, शोभा वाघमारे सुशीला गायकवाड,अश्विनी, राधाबाई वीर, सुमन वीर, लता विर, कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्रकाश खंडारे, बी.जी दळवी, शिवम सुनील सोनवणे व परिसरातील बहुसंख्य पालक विद्यार्थी उपस्थित होते.








