“चला जाणूया नदीला” अभियान मांजरा नदी काठच्या गावांमध्ये होणार सहा दिवस नदी संवाद यात्रेचे आयोजन-जिल्हाधिकारी

Beed

“चला जाणूया नदीला” अभियान मांजरा नदी काठच्या गावांमध्ये होणार सहा दिवस नदी संवाद यात्रेचे आयोजन-जिल्हाधिकारी

· स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त राज्य सरकारचा उपक्रम

बीड/वार्ताहर

दि. 27:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त राज्य सरकारने राज्यातील विविध जिल्हयातील नद्यांच्या प्रदुषण, अतिक्रमण आदी धोक्यांपासून बचावासाठी “चला जाणूया नदीला” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील मांजरा व होळणा या तिच्या उपनदीची निवड करण्यात आली आहे. जिल्हयातील मांजरा नदीच्या उगमापासून जिल्ह्यातील नदी काठच्या भागात येणारी गावे व तेथील नागरीकांमध्ये जनजागृतीसाठी 4 जानेवारी 2022 पासून 6 दिवस नदी संवाद यात्रेचे आयोजन केले जाईल. या अंतर्गत नदीचे महत्व जनतेला समजावून देतानाच पुढच्या पिढयांसाठी अस्तित्व सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात त्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी अभियानाच्या राज्यसमितीचे सदस्य अनिकेत लोहिया व यशदा संस्थेचे मार्गदर्शक व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे व जैवविविधता अभ्यासक संशोधक डॉ. अमित गोखले व विविध शासकिय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले की पाणी असेल तर जीवन आहे आणि माणूस, प्राणी, पक्षी अशा सर्वांना पाणी पुरवठा करणारा प्रमुख स्त्रोत असलेल्या नदीशी जनतेच नाते जोडण्यासाठी “चला जाणूया नदीला” अभियान राबवले जाणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी या विषयी उपक्रमाच्याद्वारे जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे. नदीला अमृतवाहिनी बनवण्यासाठी मसुदा तयार करणे यासाठी सर्व जिल्हयाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. या अनुषंगाने जलतज्ञ राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नद्या अमृतवाहिनी बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुढच्या पिढीसाठी पुढील काळासाठी नदी वाचवणे आवश्यक आहे .त्यामुळे चला जाणूया नदीला अभियाना सुरू करण्यात येत आहे असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले .

यावेळी या अभियानाच्या राज्यसमितीचे सदस्य श्री. लोहिया व डॉ. सुमंत पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी सहभाग सर्वांनी घेण्याची गरज व्यक्त केली.

मांजरा नदी जिल्ह्यातून वाहताना 90 किलोमीटर अंतरात पश्चिम काठवर 4 तालुके आणि 52 गाव येतात. मांजरा नदीचा प्रवाह बीड जिल्हयातून पुढे लातूर जिल्हयात जातो. नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार करणे, नदी खोल्यांचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्यमान नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी या बाबतची माहिती संकलन करणे. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, आणि मुख्य म्हणजे या नदी विषयी जनजागृती करणे. अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे. नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे हे या अभियानात अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले.

  या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नद्यांच्या उगमापासून जिल्हा सीमेपर्यंत पर्यंत चार जानेवारीपासून नदी संवाद यात्रा काढली जाणार आहे. जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील जैवविविधता, पर्यटन स्थळे,पासून ते नदी काठच्या गावातील पाण्याच्या नमुन्या पर्यंत या यात्रे मधून वीस प्रकारची माहिती नोंदवली जाणार आहे . बैठकीत बीड जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेल्या मांजरा नदी काठी यात्रा काढली जाणार असल्याची माहिती यावेळी सदस्य मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी दिली. नदीकाठच्या गावातून नदी विषयक जनजागृती करणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथून मांजरा नदी उगापासून या नदीची यात्रा सुरू होणार आहे.

गेल्या काही काळापासून पावसाच्या अनियमितता मुळे अनेक बदल होतात .खते आणि किटकनाशक यांच्या अती वापर यामुळे शेतिची सुपीकता कमी होते .त्या बरोबर त्या खते आणि किटकनाशक चे घटक नदीच्या पाण्यात जावून प्रदुषण होत आहे नद्या आता आजारी पडल्या आहेत त्यांना पुन्हा नीट करणे अपेक्षित आहे असे डॉ. सुमंत पांडे म्हणाले . यावेळी पर्यावरणतज्ञ अजित गोखले, लालासाहेब आगळे आदी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी या अभियानाच्या जनजागृतीसाठी पुढे येण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

Sharing

Visitor Counter